Hingoli News 
मराठवाडा

औंढेकरांचा ‘जनता कर्फ्यू’ला शंभरटक्के प्रतिसाद

कृष्णा ऋृषी, जगन्नाथ पुरी

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) :  कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यावर आळा बसावा म्हणून केंद्र व राज्य शासनाकडून रविवारी (२२ मार्च २०२०) अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला औंढ्यासह तालुक्यातील नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.   

औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील  गावागावातील बाजारपेठा रविवारी बंद ठेवून  नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. औंढा नागनाथमधील डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक , श्रीनागनाथ मंदिर परिसर, बसस्थानक, उपबाजार समिती परिसरामध्ये रविवारी शुकशुकाट होता. शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता.  

कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. त्याच अनुषंगाने आज राज्य शासनाकडून अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचा निर्णय केला. या निर्णयाला औंढेकरांनी भरभरून प्रतिसाद सकाळपासूनच आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. यात मेडिकल किराणा व रुग्णालय या अत्यावश्यक सेवा सुरू असून नागरिक आपापल्या घरी राहून कोरोना विरुध्द लढाई देत आहेत. आज सकाळपासूनच तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगरपंचायतचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव व पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांच्याकडून औंढा नगरीमध्ये गस्त घालून घरातच राहण्याचे आवाहन केले जात होते.  

सेनगावातही शुकशुकाट  
सेनगाव : कोरोना विषाणुजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सेनगावातील नागरीकांनी घरातच राहणे पसंत केल्याने रस्ते निर्मनुष्य होते. कोरोनाचा  संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरावर महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. त्यामुळे सेनगाव  तालुका कोरोना मुक्त जरी असला तरी, या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी महसूल प्रशासन, आरोग्य व पोलीस विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.  तहसील प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तालुका ठिकाणी शंभर टक्‍के मुलांचे असलेले शासकीय वस्तीगृह अधिग्रहीत करून ठेवले आहे.  दररोज तालुक्यात स्थलांतरित नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम होत आहे.  आठवडी बाजारही बंद केले असून, प्रशासकीय  यंत्रणा या आजाराबाबत अलर्ट झाली आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उपाययोजनांची काळजी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्युचे आवाहान केले होते.  तालुक्‍यातुन या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  सकाळीच दुधासाठी तुरळक नागरिक निघाले ते परत आल्यावर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी घरात राहून वेळ घातला. शहरातील विविध प्रभार्गांतील अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल व हॉस्पिटल उघडी होती. बहुतांश व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. कोरोना आजाराविरुद्ध अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य व इतर यंत्रणांचे कौतुक करण्यासाठी घरांच्या बाहेर निघून टाळ्या वाजविण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanchita Ugale: एक्स प्रियकराचा त्रास, आरोग्य समस्या की नैराश्य? अभिनेत्री संचिता उगलेने का संपवलं आयुष्य? मैत्रिणीनं सगळंच सांगितलं!

IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...

Strait of Hormuz: शांतता करार झाला, पण होर्मुजमधून जहाजांची वाहतूक धोकेदायकच! आंतरराष्ट्रीय शिपिंग संघटनेने स्पष्ट केली भूमिका

National Volleyball Player Dies: राष्ट्रीय हॉलीबॉलपटू व प्रयोगशील शेतकरी रमेश सहालुगडे यांचे विहिरीत पडून अपघाती निधन

Pune Civic Schools PPP: आकांक्षा फाऊंडेशनसह अन्य संस्थांना मनपा शाळांचे दरवाजे खुले; गणेश बिडकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT