Crime
Crime Sakal Digital
मराठवाडा

Osmanabad | कळंबमध्ये पतीने पत्नीची केली कोयत्याने निर्घृण हत्या

दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद ) : कळंब (Kalamb) तालुक्यातील रांजणी येथे अज्ञात कारणाने पतीने ५५ वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना मंगळवार (ता.एक) पहाटेच्या सुमारास घडली. मंगल विठ्ठल संगापुरे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती विठ्ठल संगापुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान विठ्ठल हा मनोरुग्ण असून मागील काही वर्षांपासून औषध गोळ्या सुरू आहेत. यातून हे क्रूर कृत्य केले असावे अशी चर्चा आहे. पोलिसांनी सांगितले की, रांजणी शिवारात तटबोरगाव रस्त्यावर शेतात विठ्ठल संगापुरे आपल्या पत्नी सोबत वास्तव्यास होते. मंगळवार (ता.एक) पहाटे १२ ते ४ वाजेच्या सुमारास पत्नी मंगल हिच्यावर कोयत्याने गळ्यावर तसेच चेहऱ्यावर वार केले. त्यात वय ५५ वर्षे असलेली मंगल गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. (Osmanabad)

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रांजणीचे सरपंच श्री आगरकर यांनी शिराढोण पोलीसांना सदरील घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश, सहायक पोलीस निरीक्षक वैभव नेटके, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोडसे, पोलीस कर्मचारी शिवाजी गवळी, शौकत पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस पंचनामा करुन आरोपी विठ्ठल संगापुरे यास ताब्यात घेतले. मृत महिलेचे शवविच्छेदन शिराढोण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. पत्नीचा खुण करण्यामागचा उद्देश मात्र स्पष्ट होवू शकलेला नाही. या प्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकरी विठ्ठल यास पोलिसांनी अटक केली आहे.

पती मनोरुग्ण

रांजणी येथील या घटने संदर्भात तपासासाठी उस्मानाबाद येथील फाॅरेन्सिक विभागास सदरील माहिती दिल्यानंतर तेथून फाॅरेन्सिक विभागाच्या टीमनेही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी लागणारे नमुने हस्तगत केले. दरम्यान पत्नीचा खून करणारा विठ्ठल यांना मनोरुग्णच आजार आहे. गेल्या काही वर्षांपासून औषध गोळ्या सुरू आहेत, अशी रांजणी गावात चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT