railway
railway 
मराठवाडा

हैदराबाद पुणे रेल्वे रोज धावणार? राज्यमंत्री बनसोडे आणि महाव्यवस्थापका सोबतच्या बैठकीत निर्णय

युवराज धोतरे

उदगीर (लातूर): बिदर-उदगीर- लातूर मार्गावरून आठवड्यातून तीन दिवस धावणारी हैदराबाद -पुणे ही रेल्वे आता दररोज धावणार आहे. याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे, रेल्वे संघर्ष समिती उदगीर व सिकंदराबाद येथेल दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय झाला. तसा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असून त्यास लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली आहे.

सोमवारी (ता.२२) सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश अंबरखाने व सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी भेट घेऊन या भागातील रेल्वे प्रश्नासंदर्भात मागण्या सादर केल्या. 

यावेळी झालेल्या चर्चेनंतर उदगीर- लातूर मार्गावरून आठवड्यातून तीन दिवस धावणारी हैदराबाद-पुणे ही रेल्वे नियमित करण्याचे आश्वासन देत रेल्वे महाव्यवस्थापक मल्ल्या यांनी हैदराबाद ते मुंबई ही बिदर-उदगीर-लातूर मार्गे नवीन गाडी सोडणे, परळी ते तिरुपती मार्गे लातूर रोड-उदगीर-बिदर ही नवीन गाडी सुरू करणे व हैदराबाद बिदर इंटरसिटी एक्स्प्रेस लातूरपर्यंत विस्तारित करणे या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारामुळे यापूर्वी मध्य रेल्वे व आता दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकासोबत बैठका होऊन या भागातील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी वेग मिळाला असून आगामी काळात अनेक नवीन गाड्या या मार्गावरून धावण्यासाठी रेल्वे संघर्ष समिती पाठपुरावा करणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दिली.

सध्या उदगीरच्या रेल्वे स्थानकावरून शेतीमाल पाठवण्याची व्यवस्था रेल्वे बोगीद्वारे सुरू करण्यात आली आहे. येथील दोन हजार मेट्रिक टन सोयाबीन रेल्वेबोगी द्वारे गुजरातला पाठवण्यात आले आहे. शिवाय अनेक नवनवीन रेल्वेगाड्या या मार्गावरुन सुरू करण्यासंदर्भात राज्यमंत्री श्री बनसोडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या भागाचा अनुशेष लवकरच भरून निघणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT