file photo 
मराठवाडा

‘कोरोनातून मी असा झालो बरा!’

दिलीप मोरे

देवगावफाटा (जि.परभणी) : एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला कोरोना झाला, कोरोना झाल्याचे समजताच पहिल्यांदा माझे हातपायच गळाले. काय करावे काही समजत नव्हते. परंतु, डॉक्टर, परिचारिका यांनी केलेली नियमित तपासणी व सोबतच दिलेला धीर आणि कोरोनाशी लढण्याचे बळ दिल्यामुळे आज मी कोरोनावर मात करू शकलो. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका या देवासारखे आहेत. त्यामुळे कुणीही कोरोनाची भीती बाळगू नये, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असा संदेश बुधवारी (ता. तीन) कोरोनावर मात केलेल्या देवगावफाटा (ता. सेलू) येथील एका कोरोना रुग्णाने दिला आहे.


देवगावफाटा येथे काही दिवसांपूर्वी पुणे येथून आलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्या युवकावर सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारप्रसंगी रुग्णालयात एकप्रकारे परिवारातील सदस्याप्रमाणे बाधित रुग्णांना वागणूक दिली जात होती. त्या ठिकाणी दोन वेळा चहा, नाष्टा व जेवण मिळत असल्याने रुग्णालयात असल्याची फारशी जाणीव झाली नाही.

आशा पल्लवित

वेळोवेळी दिल्या जात असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर गोळ्या व औषधी घ्यायचो. डॉक्टर तपासणीला आल्यावर नेहमी चिंता करू नका, आनंदात राहा, कोरोना लवकर बरा होईल, असे सांगत असल्यामुळे भीती दूर होऊन आपण आता लवकर बरे होऊ, ही आशा पल्लवित झाली आणि त्यामुळे कोरोनावर मात केली, असे कोरोनामुक्त झालेल्या युवकाने सांगितले. 

पुष्पगुच्छ देऊन स्वागत
सदरील रुग्ण रुग्णालयातून बरा होऊन घरी जात असताना उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय हरबडे, अशोक अंभोरे, पत्रकार इलियास, विवेक गिरी आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आत्मविश्वासाने केली कोरोनावर मात
कोणतेही यश मिळविण्यासाठी जसा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, तसाच कुठल्याही आजारावर मात करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो, हे माझ्या स्वतःच्या अनुभवामुळे सिद्ध झाले. सुरवातीला कोरोना झाल्याचे समजल्यावर आता कसे होईल, कोरोनावर लस नाही, त्यामुळे आपण बरे होऊ का नाही, अशा वेगवेगळ्या शंका मनात येत होत्या. त्यातूनच भीती वाटायची. मात्र, डॉक्टर, परिचारिका यांनी दिलेल्या धिराची मला खूप मोठी मदत झाली आणि यातून माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला व त्यामुळे मी ही लढाई जिंकलो, असे या युवकाने सांगितले.

 

आरोग्य विभागाच्या हाताला यश
सेलू तालुका कोरोनापासून दूर होता. मात्र, परजिल्ह्यातून तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि तालुक्यात खळबळ उडाली. परंतु, आता कोरोनाबाधित असलेले रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी पोचत असल्याने आरोग्य विभागाच्या हाताला यश मिळत आहे.
- डाॅ. संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय सेलू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Lohagad murder case: लोहगडावर मे महिन्यापासून ‘रेकी’, कॉल-मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट; केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

SCROLL FOR NEXT