जालना ः कदीम जालना पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी.  
मराठवाडा

जालन्यासह ठिकठिकाणी हातभट्ट्यांवर छापेसत्र 

उमेश वाघमारे

जालना - स्थानिक पोलिस ठाण्यांकडून आता हातभट्ट्यांवर छापे टाकण्यास सुरवात झाली आहे. कदीम जालना पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) शहरातील कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून तब्बल तीन हाटभट्ट्या उद्धवस्त करत सव्वालाखांची गावठी दारू व रसायन नष्ट केले आहे. तर दारू बंदी विशेष पथकासह तालुका जालना पोलिस, गोंदी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून हातभट्ट्या उद्धवस्त केल्या आहेत. 

लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व उद्योग, बाजारपेठेसह मद्य विक्री बंद आहे. मात्र, शहरासह जिल्ह्यात लॉकडाउन दरम्यानही हातभट्ट्या सुरू आहेत. या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकाकडून सतत छापे टाकरण्यात येत आहेत. मात्र, स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या हातभट्ट्यांकडे लक्ष देण्यास तयार नव्हते. या संदर्भात 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता स्थानिक पोलिस ठाण्याकडून त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापे टाकण्यास सुरवात केली आहे. 

कदीम जालना पोलिसांनी शहरातील कैकाडी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.२८) छापा टाकून तब्बल तीन हातभट्ट्या उद्धवस्त केल्या. यावेळी एक लाख ११ हजार ५०० रुपयांची गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आले. तसेच संशयित कैलास धोंडीराम जाधव, मगन लोकनाथ पवार या दोघांसह एका महिलेला कदीम जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ट्रमसह इतर साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे. 

तालुका जालना पोलिसांनी व विशेष पथकाने मंगळवारी (ता.२८) सिद्धार्थनगर येथे छापा टाकून तब्बल ३८ हजार ५०० रुपयांचे रसायन व साडेतीन हजार रुपयांची गावठी दारू नष्ट केली. या प्रकरणी संशयित संतोष सुरेश गायकवाड याला पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दारू बंदी विशेष पथकाने कैकाडी मोहल्ला येथे छापा टाकून एक हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे. 
गोंदी पोलिसांनी मंठतांडा येथील गायरान जमिनीवर सुरू असलेल्या हातभट्टीवर सोमवारी (ता.२७) छापा टाकला. यावेळी संशयित अंबादास सोनाप चव्हाण, प्रकाश धारू राठोड, रवी किसन आढे, शरद राठोड (सर्व रा. मंठतांडा ता. अंबड) यांच्या विरोधात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT