मराठवाडा

Video : पेट्रोलपंप जनमानसांत विश्वासपात्र ठरेल : लोहिया

सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्हा पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक संरक्षण देण्यासाठी या पेट्रोलपंपाची उभारणी करण्यात आली आहे. हा पेट्रोलपंप जनमानसांत विश्वासपात्र ठरेल व जिल्ह्यात नावाजलेला पेट्रोलपंप म्हणून पोलिस पेट्रोलपंपाची ओळख निर्माण होईल, असा आशावाद नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवारी (ता. १४) व्यक्त केला.

परभणी जिल्हा पोलिस कल्याण निधीअंतर्गत जिल्हा पोलिस पेट्रोलपंपाचे उद्‍घाटन मंगळवारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते झाले. उद्‍घाटन कार्यक्रमास पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाप्रबंधक अजय श्रीवास्तव, उपमहाप्रबंधक सुहास तुमाने, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, सहायक पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, पोलिस उपाधीक्षक सुनील ओव्हळ यांच्यासह पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. लोहिया म्हणाले, ‘‘पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीसाठी पोलिस कल्याण निधी आहे. परंतु, आलीकडच्या काळात हा निधी कमी प्रमाणात जमा होत होता. खडतर सेवा देतांना पोलिसांच्या कुटुंबीयांवर आलेल्या संकटाकाळी पोलिस दल कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे असते. त्यासाठी पोलिस कल्याण निधीचा वापर केला जातो. या निधीतून पोलिसांसाठी व्यायाम शाळा, अभ्यासिका, दवाखान्याची निर्मिती या निधीतून केली जाते. त्यासाठी निधी उभारणे महत्त्वाचे आहे. यासाठी हा पेट्रोलपंप उभारण्यात आला आहे. जनमानसांत हा पेट्रोलपंप विश्वास निर्माण करेल याची खात्री असून याद्वारे पोलिस व सर्वसामान्य नागरिकांत सुसंवादही घडेल. अतिशय कमी वेळेत या पेट्रोलपंपाची मान्यता व उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे कौतुक.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले. आभार सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मानले.

परभणीकरांसाठी पोलिसांकडून भेट
पोलिसांनी उभारलेला पेट्रोलपंप हा परभणी शहरातील नागरिकांसाठी मोठी भेट आहे. त्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने पुरेपूर मदत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील क्रमांक एकचा पेट्रोपपंप होईल, अशी आशा आहे. यातून पोलिस दलाला बिझनेस तर होईलच; परंतु यातून ग्राहकांचे समाधानदेखील केले जाईल, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाप्रबंधक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले.

कल्याण निधीची उभारणी होणार
मी परभणी जिल्हा पोलिस अधीक्षकपदी रुजू झाल्यानंतर माझ्यासमोर दोन पेच उभे राहिले. त्यातील सर्वांत मोठा पेच हा पोलिस कल्याण निधीचा होता. त्यामुळेच मी पेट्रोलपंपाच्या उभारणीसाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले. हा पेट्रोलपंप परभणीकरांसाठी कल्याणकारी ठरणार आहे, असा विश्वास पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी व्यक्त केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT