file photo 
मराठवाडा

"सोशल डिस्टन्स’ पाळून सुरू होऊ शकतात उद्योग -उद्योजक मुकुंद कुलकर्णी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : सध्याच्या काळात जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण हे किती दिवस करणार? यातून देशाचे अर्थचक्र चालू राहणार का? याचा विचार होणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करीत काही उद्योग सुरू होऊ शकतात, असे मत एमएसएमईचे प्रतिनिधी उद्योजक मुकुंद कुलकर्णी व्यक्त केले. तसेच याबाबत ‘सकाळ’च्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. 


मुकुंद कुलकर्णी म्हणाले, की लॉकडाऊनच्या काळात काही नियम हे थोडेसे कंट्रोल पद्धतीने बदल करणे गरजेचे आहे. आज तीन ते साडेतीन लाख ट्रक रस्त्यावर उभे आहेत. यात मोठ्या प्रमाणावर माल अडकून पडला आहे. त्यांची सर्वांत आधी मूव्हमेंट होणे गरजेचे आहे. या उद्योगांनी प्रोजेक्टसाठी ऑर्डर घेतलेले आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. ज्यांच्या ऑर्डर तयार आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यांच्यासाठी दळणवळण होणे गरजेचे आहे. बऱ्याच कंपन्यांचे वर्क टू होम सुरू आहे. मात्र त्यांच्या घरी असलेल्या सिस्टीम मेंटेनन्स करणे गरजेचे आहे. यासाठी डेटा पाठवणे आणि कनेक्ट करणे गरजेचे आहे. यासाठी दोन टक्के लोकांना पास देणे आवश्यक आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उद्योग सुरू करत, हाताला काम मिळण्यासाठी व पैशाचे चक्र सुरू होणे यासाठी डिस्टन्सिंगचे नियम पाळून जिथे एका शिफ्टमध्ये शंभर लोक काम करतात, तिथे त्या ऐवजी २० टक्के लोकांना परवानगी दिली तर काही उद्योग तीन शिफ्टमध्ये चालू शकतील. यातून आपण ६० टक्केपर्यंत प्रॉडक्शन, सर्व्हिसेस  सुरू करू शकतो.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

यातून प्रामुख्याने दोन गोष्टी होऊ शकता. एक लोकांच्या हाताला काम व पैसा मिळेल. दुसरे सरकारला टॅक्सच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वापरता येईल, असेही श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT