vima kavach 
मराठवाडा

कळमनुरीत बाराशे कर्मचाऱ्यांना विमा कवच

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर कर्तव्य बजावत असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाअंतर्गत एकूण १ हजार २५८ कर्मचाऱ्यांचा ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता पंचवीस लाख रुपये विमा सुरक्षा कवच मिळणार आहे.

कोरोना आजारामुळे उद् भवलेली गंभीर परिस्थिती पाहता प्रशासनामधील विविध विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये मोठा समावेश आहे. 

कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना

कोरोना आजाराचा या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये, याकरिता कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत स्तरावरील सफाई कर्मचारी, सेवक, संगणक ऑपरेटर, ग्रामविकास अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कामे नेमून देण्यात आली आहेत.

ग्रामस्थांच्या नोंदी घेण्याचे काम

 कामासाठी स्थलांतरित झालेल्या मात्र आता मूळ गावी परतलेल्या प्रत्येक ग्रामस्थांची नोंद घेऊन त्यांच्या आरोग्यविषयक हालचालीवर हे कर्मचारी लक्ष ठेवत आहेत. मोठ्या शहरातून साडेचार हजार ग्रामस्थ गावी परतले आहेत. या ग्रामस्थांच्या नोंदी घेण्याचे काम पथकाला नेमून देण्यात आले आहे. त्यानुसार हे कर्मचारी जीव धोक्यात घालून कामे करीत आहेत.

माहिती संकलित करण्याचे निर्देश

आता शासनाने गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा नव्वद दिवसांसाठी २५ लाख रुपयांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कळमनुरी पंचायत समिती, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागांतर्गत कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.

२५ लाख रुपयांचा विमा

 त्यामधून आता प्रत्यक्ष कर्तव्यावर असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सेवक, ग्रामविकास अधिकारी अशा १ हजार २५८ कर्मचाऱ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपयांचा विमा उतरविला जात आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांतून या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

माहिती होतेय संकलित

प्रत्यक्ष गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने विमा सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची माहिती संकलित करून आधारकार्ड व इतर कागदपत्रे शासनाकडून देण्यात आलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्याकरिता देण्यात आली आहेत.
-राजकुमार धापसे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

Chakan Industrial Area Roads: वाहतूक कोंडीने उद्योगांची घुसमट; चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था

SCROLL FOR NEXT