It has been raining for the third day in a row in Hingoli.jpg 
मराठवाडा

हिंगोलीत सलग तिसऱ्या दिवशी पावसाच्या सरी; ढगाळ वातावरण सुर्यदर्शनही नाही

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी रविवारी (ता.११) सकाळी साडेसहा ते आठ यावेळी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळी आठ वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे सुर्यदर्शन झाले नाही. या पावसाने हळद, गहू, ज्वारी काढणीच्या कामास व्यत्यय आला असून काढणी केलेली पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.

जिल्ह्यात शुक्रवारपासून वातावरणात बदल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, तसेच शनिवारी हिंगोली शहरासह तालुक्यातील कनेरगाव नाका, फाळेगाव, आडगाव, बळसोंड, खांबाळा, पांगरी, कारवाडी, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, सवना, परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या तर रविवारी सकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. ढगाळ वातावरणामुळे सुर्यदर्शन देखील झाले नाही. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

अचानक आलेल्या या सरींमुळे शेतात काढून टाकलेली हळद, गहू, रब्बीची ज्वारी भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाऊस अचानक आल्यामुळे पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोरेगाव, सवना परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी हळद, गहू, ज्वारी काढणीची कामे सुरू केली आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे या कामाला व्यत्यय येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतात काढणी केलेली पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. यावर्षी निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याचे शेतकऱी सांगत आहेत. ऐन पिके काढणीस आल्यावर येणाऱ्या अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान होऊन उत्पन्न देखील घटत आहे. रब्बीच्या पिकातील टाळकी ज्वारीपासून उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था होते तर अनेक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा विक्रीतून आर्थिक मदत मिळते. मात्र पावसाने काढणी केलेले पिक भिजल्याने त्यांच्या विक्रीवर परिणाम होतो, असे ज्वारी उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT