Badnapur Police News
Badnapur Police News 
मराठवाडा

बदनापुरात नाकाबंदी करताना पकडला देशीदारुचा साठा, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : बदनापूर पोलिसांच्या पथकाने नाकाबंदी करीत असताना एका मालवाहू वाहनातील देशीदारूचे शंभर बॉक्स जप्त केले आहे. या कारवाईत देशीदारूचा साठा आणि मालवाहू वाहन असा एकूण 4 लाख 49 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (ता.दहा) पहाटेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, बदनापूर पोलिसांच्या वतीने कोरोना प्रतिबंधक नियमांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे.

शनिवारी बदनापूर पोलिसांचे पथक पोलिस ठाण्यासमोर नाकाबंदी करीत असताना संशयित मालवाहू वाहन थांबवून त्याची तपासणी केली. या वाहनात ठेवलेले देशीदारूचे तब्बल शंभर बॉक्स ज्याची बाजारात किंमत 2 लाख 49 हजार रुपये व 2 लाख रुपये किंमतीचे वाहन असे एकूण 4 लाख 49 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैधरित्या दारूच्या साठ्याची वाहतूक करणाऱ्या संशयित राहुल किसन वाढेकर (रा. ढोरपूरा रामनगर, जालना) व मंगेश देविदास नाईक (रा. रामनगर पोलिस कॉलनी, जालना) यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणी सहायक फौजदार निवृत्ती शेळके यांच्या तक्रारीवरून त्या दोघा जणांविरुद्ध बदनापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती खेडकर करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक श्री. खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे, सहाय्यक फौजदार निवृत्ती शेळके, पोलिस मुख्य जमादार श्री. बुनगे, चालक दुर्गेश राठोड, गृहरक्षक दलाचे जवान श्री. पवार, श्री. गाडेकर, श्री. शिंदे, शेख नबी आदींच्या पथकाने केली.
कोट
 


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT