Accident News 
मराठवाडा

घर अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने घातला घाला, तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन येथून रात्रपाळीचे काम आटोपून सकाळी घराकडे निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला. घर अवघ्या काही अंतरावरच असतानाच दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना (ता.३१) रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भोकरदन पारध मुख्य रस्त्यावरील सुरंगळी पाटीजवळ घडली. बालाजी समाधान बावस्कर (वय २९, रा.देहेड, ता.भोकरदन) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील देहेड येथील बालाजी बावस्कर हा तरुण भोकरदन शहरातील औटी पेट्रोलपंप येथे कामावर आहे. शनिवारी (ता.३०) त्याची रात्र पाळी असल्याने तो रविवारी (ता.३१) सकाळी ड्युटी करून साडेदहा वाजेच्या सुमारास देहेड गावी दुचाकीने घराकडे जात होता. यादरम्यान तालुक्यातील मनापूर येथील सुधाकर संपत दळवी (वय ५५) व माणिक संपत दळवी (वय ४५) हे दोघे भाऊ दुचाकीने देहेड येथून एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाहून भोकरदनकडे परतत असताना भोकरदन पारध मुख्य रस्त्यावरील सुरंगळी पाटीजवळ दोनही दुचाकीत समोरासमोर जोराची धडक झाली.

या अपघातात बालाजी बावस्कर या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सुखदेव संपत दळवी व माणिक संपत दळवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेतील मृत तरुण बालाजी बावस्कर याच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने देहेड गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांकडून पंचनामा करून अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT