Jalna Accident News 
मराठवाडा

झेंड्याच्या चबुतऱ्याला धडकल्याने दुचाकी फेकली गेली दूर; सुनीलचा जागीच मृत्यू, तासभर पडून होता मृतदेह

वसंत काळवणे

रोहिलागड (जि.जालना) : रस्त्याच्या मधोमध असलेल्या झेंड्याच्या चबुतऱ्याला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना जामखेड-बदनापूर मार्गावर जोगेश्वरवाडी पाटीवर बुधवारी (ता.तीन) रात्री साडेआठ वाजता घडली.वाशिम जिल्ह्यातील सुनील पांडुरंग लाखुळे (वय ३३, रा.आगरवाडी) हा युवक जामखेड-बदनापूर मार्गावर दुचाकीवरून बुधवारी (ता.तीन) रात्री साडेआठ वाजता जात होता.

तेव्हा जोगेश्‍वरवाडी पाटीच्या परिसरात रस्त्याच्या मधोमध असलेल्या झेंड्याला त्याची दुचाकी जोराने धडकली. त्यात गंभीर जखमी होऊन सुनील हा जागीच ठार झाला. दुचाकीचे समोरचे चाक तुटले, शिवाय दुचाकी दूर फेकल्या गेली. या अपघातानंतर जवळपास एक तासाहून अधिक काळ सुनीलचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. त्यानंतर जामखेड पोलिस चौकीचे कर्मचारी तसेच आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घटनास्थळी आली.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

मार्गावर ठिकठिकाणी झेंडे
जामखेड-बदनापूर मार्गाचे नुकतेच रुंदीकरणाचे काम झालेले आहे. त्यामुळे या मार्गावर रहदारी वाढली आहे. त्यातच मार्गावर ठिकठिकाणी झेंडे उभारलेले आहेत. शिवाय कुठेही सूचना फलकही नाहीत. त्यामुळे नवीन येणाऱ्या वाहनचालकांना कुठलाही अंदाज येत नाही. परिणामी या मार्गावर अपघाताचे प्रकार वाढत आहेत.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT