Jalna Accident News 
मराठवाडा

दुर्दैवी! सर्जाराजाच्या जोडीला ट्रकने दिली जोराची धडक, दोघांचा जागीच मृत्यू

चंद्रकांत नाटकर

शहागड (जि.जालना) : शहागड-पैठण राज्यमार्गावर (बगळेगाव, ता.अंबड) शिवारात ट्रकने दोन बैलगाड्यांना धडक दिल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन बैलांसह एक मजुर  जखमी झाला आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे परिसरात अनेक ऊसाच्या बैलगाड्यांचा वावर आहे. शुक्रवारी (ता.१२) शहागड-पैठण राज्यमार्गावरील बळेगाव पाटी (ता.अंबड) येथे ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने दोन बैलगाड्यांना जोराची धडक दिली. यामध्ये तर दोन-दोन बैलांसह एक मजुर ही जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समर्थ सहकारी साखर कारखान्याचे विठ्ठलराव झिंजुर्डे, सुरक्षा विभागाचे श्री. ढाकणे, मुकादम सखाराम घाडगे, सुनील नरवडे, साबू शेख यांनी घटनास्थळी दाखल होत. जखमी मजूर कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या रूग्णवाहिकेतून गेवराईमधील उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान शहागड पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे व कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान अपघातस्थळी जखमी बैलावर उपचार व मृत बैलाचे उत्तरीय तपासणीसाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर योगेश अक्षय, डॉक्टर एस.डी. औटे, डॉ.श्री.नाटकर, पशुधन पर्यवेक्षक हिरडपुरी यांनी केले. दरम्यान या प्रकरणी शहागड पोलिस चौकीत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Goa flight: सोलापूर-गोवा विमानसेवा हाऊसफुल; वर्षभरात १४ हजार प्रवासी, तिकीटदर १२ हजारांवर

Latest Marathi News Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा मुद्दा पटल्यास भाजपात प्रवेश करेन- संजय राऊत

अल्फाच्या सेटवर आलियाच बॉबी देओलसोबत खरंच भांडण झालेलं? अभिनेता खुलासा करत म्हणाला....'त्यावेळी अनेक गोष्टींकडे मी...'

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

SCROLL FOR NEXT