Jalna Bhokardan News 
मराठवाडा

डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाने सोडले प्राण, वडिलांनी फोडला हंबरडा

दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) : आकाशात अचानक काळे ढग दाटून आल्याने शेतात सोंगून ठेवलेला मका झाकण्यासाठी शेतकरी पिता- पुत्र धावपळ करीत असताना कडकडाट करीत वीज कोसळली. गंभीर जखमी झालेल्या एकुलत्या मुलाचा वडिलांच्या डोळ्यासमोर जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तडेगाव वाडी (ता. भोकरदन) येथे गुरुवारी (ता.१८) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल रायसिंग सुंदर्डे (वय २५) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रायसिंग सुंदर्डे यांची तडेगाव वाडी शिवारात शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता मुलगा. त्याला एक लहान मुलगा आहे. तालुक्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, गारपीट झाली. याच दरम्यान राहुल व त्याचे वडील शेतात सोंगून गंजी करून ठेवलेली मका झाकण्यासाठी प्रयत्न करीत होते. वडील एका बाजूने तर मुलगा काही अंतरावर काम करीत असताना विजांचा कडकडाट सुरू झाला.

राहुलच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. वडिलांना काही कळायच्या आत हे सर्वकाही घडले, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. वडिलांनी हंबरडा फोडला. त्यामुळे परिसरातील शेतकरी धावले. त्यांनी राहुलला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Audul voter verification drive : आडूळ केंद्रात मतदार पडताळणीला वेग : १०,८०९ पैकी ३,०५४ फॉर्म ऑनलाइन, २९ जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरण्याचे आवाहन

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात इंधनटंचाई चालणार नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पेट्रोल-डिझेल, गॅसपुरवठ्याचा ठोस आराखडा सादर करा

SCROLL FOR NEXT