फोटो 
मराठवाडा

जनता कर्फ्यू : पोलिसांचा चोख बंदोबस्त, एसपी मगर रस्त्यावर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील जनतेने जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेऊन कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराला आळा घालण्यासाठी आज बंद पाळला. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना जनता कर्फ्यू दरम्यान शांतता राहावी म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागांमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरातील फिक्स पॉईंट :
जनता कर्फ्यू शांततेत पार पाडण्याकरिता शहरातील सर्व पोस्टेच्या हद्दीत विविध ठिकाणी एकूण ३२ ठिकाणी फिक्स पॉइंट तयार करून १५ अधिकारी व १२० कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

पेट्रोलिंग मोबाईल :
शहरातील सर्व पोस्टे हद्दीत जनता कर्फ्यू व्यवस्थित पार पाडण्याकरिता सात मोबाईल पेट्रोलिंग तयार करून सात अधिकारी व २८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

बीट मार्शल पेट्रोलिंग :
शहरातील सर्व पोलीस ठाणेअंतर्गत २२ बीट मार्शल निर्माण केले असून बीटवर असलेले कर्मचारी दिवस- रात्र पेट्रोल करून जनता कर्फ्यू पाळण्यबाबत सूचना देत आहेत.

शहर वाहतूक शाखा :
शहरातील दोन्ही शहर वाहतूक शाखेतील सात अधिकारी व १२३ कर्मचाऱ्यांचे सकाळपासून शहरातील नेमुन दिलेल्या ठिकाणी वाहतूक पॉइंट देण्यात आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा : 
जनता कर्फ्यू व्यवस्थित पार पाडण्यासाठी व कुठलाही कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दिवसभर गस्त घालत आहेत. 

राखीव बंदोबस्त : 
शहरात अचानक उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आठ अधिकारी व ५२ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

नाका-बंदी : 
जनता कर्फ्यू निमित्ताने शहरातील वेगवेगळ्या पॉईंटवर नाकाबंदी करण्यात आली असून सदर ठिकाणी मिळून आल्याने इसमांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करून परत घरी पाठविण्यात येत आहेत. 

नांदेड शहरातील पोलीस चौकी
शहरात सहा पोलिस स्टेशनअंतर्गत नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या एकूण २५ पोलिस चौकीसाठी नेमण्यात आलेले फौजदार, सहाय्यक फौजदार दर्जाचे १२ अधिकारी व ९८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर शहराबाहेरील २९ पोलीस स्टेशनअंतर्गत जनता कर्फ्यू व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळपासून कर्तव्यावर तटस्थपणे हजर आहेत. जनता कर्फ्यूदरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT