कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : विज कंपनीच्या उपविभागात सात शाखेतंर्गत थकीत वीज बिलासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना आठ कोटी ७६ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठांनी दिले आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज परवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तालुक्यातील ३२ हजार ३०० ग्राहकाकडे मोठ्या प्रमाणावर विजेची थकबाकी आहे. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. थकबाकी न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
कर्मचाऱ्यांनाही वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कळमनुरी उपविभाग अंतर्गत मार्च अखेर आठ कोटी ७६ लाख रुपये वसुली करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी आपापल्या विभागाअंतर्गत वीज ग्राहकांकडे असलेल्या वीज थकबाकी वसुलीसाठी अहोरात्र फिरत असल्याचे चित्र असून आतापर्यंत ५५२ वीज ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या ६३ लाख पाच हजार रुपयांच्या थकबाकीसाठी प्रतिसाद न दिल्यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर कामात निष्काळजीपणा व कामामध्ये हयगई करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून नऊ कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
आतापर्यंत आठ हजार ९३० वीज ग्राहकांनी एक कोटी ३६ लाख रुपयांचा वीज भरणा केला असून मार्चअखेर देण्यात आलेले उद्दिष्ट आहे. यात कळमनुरी शहर आठ हजार ९३० ग्राहक दोन कोटी ९१ लाख रुपये, आखाडा बाळापूर दहा हजार ८६३ ग्राहकाकडे तीन कोटी एक लाख रुपये, वारंगा फाटा २९५२ ग्राहकाकडे एक कोटी चार हजार रुपये, नांदापूर दोन हजार ७४९ ग्राहकाकडे ५३ लाख रुपये, जवळा पांचाळ १८१० ग्राहकाकडून ३३ लाख रुपये, डोंगरकडा विभागाअंतर्गत दोन हजार सातशे ग्राहकाकडे ८९ लाख रुपये, अशी एकूण आठ कोटी ७६ लाख रुपये मार्चअखेर वसुलीचे उद्दिष्ट वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विज देयकाचा थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत वीज ग्राहकांनी त्यांना सहकार्य करून आपली जबाबदारी पूर्ण करावी व संभाव्य वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.
- एस. एस. रेकुळवाड, उपविभागीय अधिकारी
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.