corona virus image.jpg
corona virus image.jpg 
मराठवाडा

Corona-Virus : कळंबकरांच्या टेन्शनमध्ये का झाली वाढ, वाचा सविस्तर…

दिलीप गंभीरे

कळंब : शहरातील कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या सराफ व्यापार्याच्या संपर्कातील चार तर बड्या व्यापाऱ्याच्या कुटूंबाच्या संपर्कातील ११ व्यक्तींचा अहवाल गुरुवारी (ता.३०) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता कळंबकरांच्या टेन्शन मध्ये वाढ झाली. तालुक्यातील मंगरूळ येथे ६ रुग्ण वाढले आहेत. बड्या व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले नसल्याची माहिती समोर आली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रशासनाला बळजबरी क्वारंटाईन करावे लागले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. 

शहरातील एका सराफ व्यपाऱ्याच्या मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या संपर्कातील चार व्यक्तींना कोरोनांची लागण झाल्याचे उघड झाले. शहरातील बड्या व्यपाऱ्याचे विविध ठिकाणी व्यवसाय आहेत.

कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास येऊन ही या व्यापाऱ्याच्या कुटूंबाने दुर्लक्ष केले. शहरातील ढोकी रस्त्यावरील पेट्रोल पंप, हासेगाव येथील कापूस जिनिग व शहरातील सराफ लाईन भागात यांच्या व्यवसायाचे जाळे पसरले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार असून हे व्यापारी आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्य खुलेआम संपर्कात आल्याची माहिती उघड होत आहे. 

दरम्यान शहरातील बड्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रशासनाने बळजबरी क्वारंटाईन केले. संपर्कातील ११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. क्वारंटाईन न करण्यासाठी प्रशानावर दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. असून दबावाला बळी न पडता प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.

तालुक्याल मंगरूळ येथे ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून पॉझिटिव्ह आलेल्यांचे अहवाल औरंगाबाद येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाकडे पाठविण्यात आले होते. गुरुवारी शहरातील १५ व मंगरूळ येथील ६ असे २१ जणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी प्रदीप जाधव यांनी सांगितले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT