file photo 
मराठवाडा

एंन्जेडर हेल्थकडून ‘कर्मा’चा गौरव

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रसूती पश्च्यात कुटुंब नियोजन व गर्भपात पश्च्यात कुटुंब नियोजन सेवा गुणवत्तापूर्ण प्रदान करण्याकरिता तसेच राज्यांतर्गत आरोग्य संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी एन्जेडर हेल्थ ही संस्था व राज्य कुटुंबकल्याण कार्यालय पुणे यांच्या द्वारे राज्यांतर्गत २० जिल्ह्यामध्ये  कर्मा हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माताबाल संगोपन व शालेय आरोग्य पुणे, सहसंचालकांच्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे सन २०१८- २०१९ या कालावधीत नांदेड व परभणी या जिल्ह्याने या कार्यक्रमांतर्गत उत्कृष कार्य केलेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड,  जिल्हा शल्य चिकित्सक परभणी व एन्जेडर हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १० जानेवारी रोजी हॉटेल फर्न (परभणी) येथे कुटुंब नियोजन कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा प्रदात्याचा गौरव समारंभ घेण्यात आला.

पुरस्कार देण्यात आला
सदरील कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय माहूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मोरे, अधिपरिचारिका छाया मुदळे यांचा गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर या संस्थेसही (IUCD) तांबी श्रेणीकरिता सन्मानित करणात आले. तसेच स्त्री रुग्णालय नांदेड या संस्थेस सर्वोत्कृष्ठ गर्भनिरोधक इंजेक्शन (अंतरा) ची सेवा, कुटुंब नियोजन, मार्गदर्शन सल्लाकेंद्र व तांबी श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला.

जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी
सदर कार्यक्रमाची नांदेड जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ
भोसीकर व अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर बाह्य संपर्क अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे, डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

इतर आरोग्य संस्थांनी प्रेरणा
स्त्री रुग्णालय नांदेड  येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगेवार व वैद्यकीय अधीक्षक माहूर डॉ भोसले यांच्या अधिनस्त संबंधित कार्यक्रमात काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मा. डॉ माले यांनी केले आहे. यातून इतर आरोग्य संस्थांनी प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेचे नाव उज्वल  करावे असे आवाहन केले आहे.
  
सर्वांचे परिश्रम
सदर कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, (परभणी) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकर देशमुख, किशोर सुरवसे, (RCHO) डॉ. जी. के. सीरसुलवार तसेच  कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडण्यासाठी एन्जेडर हेल्थ या संस्थेचे प्रतिनिधी एम. कल्पना व राहुल यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT