thief.jpg
thief.jpg 
मराठवाडा

लातूर : पावणे पंधरा लाखांची बॅग चोरणाऱ्याला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हरी तुगावकर

लातूर : बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना (ता. १७) जून रोजी येथील कमिशन एजंटाची पावने पंधरा लाखाची बॅग चोरट्यांनी पळवली होती. या प्रकरणातील मुख्य चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. यात साडे तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

लातूर येथील कमिशन एजंट धनजीभाई पाबारी हे (ता.१७) जून रोजी दुपारी पावने तीन वाजता मोटार सायकलवरून बँकेत आरटीजीएस करण्यासाठी जात होते. येथील स्क्रॅप मार्केट रस्त्यावर गो-रक्षणच्या समोर दोन अज्ञात व्यक्ती मोटार सायकलवरून त्यांच्याजवळ आल्या. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी १४ लाख ७५ हजार ६०० रुपये असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली होती. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने समांतर तपास केला आहे. यात माहिती मिळाल्यानंतर शनिवारी (ता. ११) येथील बारा नंबर पाटीजवळ या शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला. यात संशयीत असलेला दिनेश बलभीम करे (रा. गौसपुरागल्ली, स्क्रॅप मार्केट रोड) हा पोलिसांना पाहून पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अटक केली. या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे. त्याच्या पाठीवर असलेल्या सॅगमधून साडे तीन लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता साथीदाराच्या सहाय्याने त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. या पूर्वीही दिनेश बलभीम करे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून इतर गु्न्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती श्री. नागरगोजे यांनी दिली. पुढील तपासासाठी त्याला गांधी चौक पोलिस ठाण्याकडे देण्यात आले आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिस नाईक सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव यांनी पुढाकार घेतला.

संपादन प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT