udgir gram panchayat 
मराठवाडा

Gram Panchayat Election: उदगीर तालुक्यात सरपंचपदाची सोडत लवकरच

युवराज धोतरे

उदगीर (लातूर): तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) रोजी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या हस्ते काढण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उदगीर तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. संबंधित गावच्या प्रतिनिधी समोर या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

उदगीर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायती पैकी ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायती अंतर्गत प्रभाग रचना, प्रभाग निहाय आरक्षण, मतदार याद्यांचे काम टाळेबंदीच्या अगोदरच पूर्ण झाले असून टाळेबंदी मुळे ही प्रक्रिया स्थगित झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करून निवडणुकीपूर्वी आरक्षणाची सोडत काढली होती मात्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ही सोडत रद्द केली होती.

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शुक्रवारी (ता.२२) रोजी आदेश काढून उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता.२९) काढण्याचे निर्देशित केले आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित गावचे लोकप्रतिनिधींनी समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

गावपातळीवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीचे अनेक ग्रामस्थ या सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष ठेवून होते. उदगीर तालुक्यातील आरक्षणाची सोडत कधी होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या ग्रामस्थांची प्रतीक्षा आता संपली असून दिवाळीनंतर लागलीच ही सोडत पूर्ण होणार आहे.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

गणरायाला निरोप देताना आक्रित घडलं! कृत्रिम तलावात शॉक लागून १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू; लेकाचा मृतदेह पाहून वृद्ध वडिलांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT