Aurangabad Corona Updates 
मराठवाडा

उदगीरात कोरोनाने सासरा, सुनेचा मृत्यू; संसर्ग वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता 

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : येथील कोरोना रुग्णालयात गेल्या चोवीस तासात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. उदगीरासह परिसरात खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  येथील कोरोना रुग्णालयात गुरुवारी (ता.आठ) कोरोनाचा उपचार घेत असलेल्या मित्र नगरमधील एका ६४ वर्षीय व्यक्तीचा दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला. रात्री साडेसात वाजता गुडसूर (ता.उदगीर) येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता.नऊ) सकाळी सव्वा सहा वाजता हंडरगुळी (ता.उदगीर) येथील ८० वर्षीय पुरुषाचा, तर आठ वाजून दहा मिनिटाला ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हंडरगुळी येथील हे एकाच घरातील सासरा व सुन असल्याची माहिती मिळाली आहे.

दुपारी येथील धन्वंतरी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय येथे रावणकोळा येथील ५६ वर्षीय महिलेचा अशा पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. घोणसी (ता.जळकोट) येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा, बावलगाव (ता.औराद, कर्नाटक) येथील साठ वर्षीय व्यक्तीचा, रावणकोळा (ता.मुखेड) येथील ५५ वर्षीय व्यक्ती अशा तिघांचा सारी सदृश्य, तर पाच कोरोनाने अशा एकूण आठ जणांचा मृत्यू चोवीस तासात झाला असल्याची माहिती कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली आहे. सध्या शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा झपाट्याने वेग वाढत आहे.

मिनी लॉकडाऊन व शासनाने घातलेल्या कडक निर्बंधांचे पालन काही प्रमाणात होत नसल्याची स्थिती आहे. सातत्याने या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. मात्र नियम तोडून अनेक ठिकाणी गर्दीची परिस्थिती निर्माण होत आहे. सध्या समूह संसर्गाला सुरुवात झाली की काय अशी परिस्थिती शहर व परिसरात निर्माण झाली आहे. अख्खे कुटुंब कोरोना बाधित होत असल्याने उदगीरकरांच्या चिंतेत भर पडली  आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT