Srushti Jagtap
Srushti Jagtap 
मराठवाडा

नववीत शिकणारी लातूरची सृष्टी सादर करणार सलग २४ तास लावणी, नव्या विक्रमाचे मानस 

हरी तुगावकर

लातूर : येथील बालकलाकार सृष्टी जगताप सलग २४ तास लावणी सादर करून आशिया रेकॉर्डमध्ये नवा विक्रम बनवणार आहे. आशिया खंडात प्रथमच मराठमोळी लावणीचा आशिया रेकॉर्ड नवा विक्रम करून मराठमोळी लावणी सातासमुद्रापार पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. त्या दृष्टीने तीने प्रयत्न सुरु केले आहेत. देशातच नव्हे तर आशिया खंडात प्रथमच लातुरामध्ये इतिहास घडणार आहे. तिच्या रूपाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणार आहे. नॉन स्टॉप २४ तास लावणीनृत्य करून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित करणार आहे.

सृष्टी सुधीर जगताप ही पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे नववीच्या वर्गात शिकत आहे. तिने अनेक कलाप्रकारात आपले प्रावीण्य दाखवले आहे. तिने किल्लारी फेस्टिवल, लातूर फेस्टिव्हल, अष्टविनायक अशा नामांकित राज्य व देशपातळीवरील नृत्य व अभिनय स्पर्धेत तिने ७१ पुरस्कार मिळवले आहेत. `ती फुलराणी`, `मी जिजाऊ बोलते`, `मी सावित्रीबाई फुले बोलते`, `मुलगी वाचवा मुलगी शिकवा` असे एकपात्री प्रयोग करून तिने समाज प्रबोधन केले आहे.

अंगावर शहारे आणणारे पोवाडा गायन करते. अशी हरहुन्नरी बालकलाकार येत्या २६ जानेवारीला दुपारी दोन वाजल्यापासून २७ जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत लावणी नृत्य सादर करून आपले आशिया बुक रेकॉर्ड स्थापित करणार आहे. हा कार्यक्रम दयानंद सभागृहात येथे होणार आहे. याच कार्यक्रमात `एक टप्पा आउट`चे सुपरस्टार बालाजी सूळ चौफेर कॉमेडी करणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी भेट देऊन चिमुकल्या सृष्टीला प्रोत्साहन देऊन मनोबल वाढवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

संपादन - गणेश पिटेकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT