Latur Updates
Latur Updates 
मराठवाडा

बिनधास्त वावर अन् ठरलेले उत्तर ! लातूरकर पाळेनात संचारबंदी

विकास गाढवे

लातूर  : कुठे जात आहात? या प्रश्नाला लोकांचे ठरलेले उत्तर होते. कोणी म्हणे किराणा सामान आणण्यासाठी, कोणी औषधी खरेदी करण्यासाठी तर कोणी दवाखान्यात दाखवण्यासाठी बाहेर पडले होते. सर्वांचे बाहेर पडण्याचे कारण हे अत्यावश्यक सेवेतच मोडणारे होते. अशीच ठरलेली उत्तर शुक्रवारी (ता. २७) महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना लोकांनी ऐकवली. गांभीर्य नसलेल्या लोकांपुढे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले होते.     


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करताना पोलिस प्रशासनाने काही दिवस कठोर भूमिका घेतली. लोकांना गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी घरात न बसता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांनी यथेच्छ धुलाई केली. याचा उलट परिणाम झाला. सोशल मीडियासह समाजात पोलिसांच्या विरोधात वातावरण तयार झाले. आरोग्याबाबत जागरूक लोकांनी मात्र, पोलिसांची बाजू उचलून धरली. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकांसोबत सहानुभूतीने वागण्याचे आदेश देण्यात आले. त्याचा परिणाम शुक्रवारी दिवसभर दिसून आला. लोक कशाचीही पर्वा न करता रस्त्यावरून फिरत होते. उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे व तहसीलदार स्वप्निल पवार यांनी सकाळी शहरातील विविध भागाला भेट देऊन लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. श्री.यादव यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या अनेकांना कशाला बाहेर पडलात, कुठे जात आहात? असे प्रश्न विचारले. सर्वांचे उत्तर संचारबंदीच्या साच्यात बसणारे होते. संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी सवलत देण्यात आली आहे. याची माहिती असल्याने सर्वांनीच किराणा सामान, भाजीपाला, दुध व औषधी खरेदीसह रूग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे सांगून न घाबरता रस्ता धरला.   

वाचा ः कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या `सक्रिय`

महापालिकेचे होम क्वॉरंटाईन
शहरात कोरोनाला रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी पुढाकार घेत आहेत. लोकांनी रस्त्यावर फिरू नये म्हणून दिवसभर शहरात फिरून त्यांना आवाहन करत आहेत. या प्रयत्नांत महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग कोठेच दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे `होम क्वारंटाईन` सुरू असल्याची उपरोधिक चर्चाही सरकारी वर्तुळात आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे महापालिका आयुक्तांचा पदभार आहे. यामुळे `आपलेच दात अन् आपलेच ओठ` म्हणून उघडपणे कोणीच काही बोलण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.   
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT