Latur News 
मराठवाडा

लातूरला भाजी मार्केटला शिस्त, ईदगाह मैदानही ताब्यात

विकास गाढवे

लातूर : संचारबंदीत फळे व भाजीपाला खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालून त्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर प्रत्यक्षात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवारी (ता. २८) भक्कम निर्णय घेतले. यात भाजीपाला मार्केटला शिस्त लावल्यानंतर दुपारी दयानंद महाविद्यालयाचा परिसर व शिवाजी चौकातील ईदगाह मैदान ताब्यात घेतले. दोन्ही ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रीसाठी सुरक्षित सामाजिक अंतरानुसार आणखी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

जुन्या गुळमार्केट परिसरात असलेल्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज सकाळी सहा ते सात दरम्यान सौदे निघून त्यानंतर ठोक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना फळे व भाजीपाला विक्री करतात. किरकोळ विक्रेते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन व मार्केटच्या परिसरात भाजीपाला व फळांची विक्री करत होते. ठोक (होलसेल) विक्रीसाठीच्या भाजीमार्केटमध्ये गेल्या काही वर्षात कमी दराने भाजी व फळे खरेदीसाठी नागरिकांनीही गर्दी करण्यास सुरवात केली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करूनही फळे व भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी काही केल्या कमी होत नव्हती. 

यावर उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) समृत जाधव व बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी व्यापाऱ्यांच्या सहभागाने उपाय शोधला. त्यानुसार शनिवारी सकाळी सौद्यात सहभागाला पात्र ठोक नऊ व्यापाऱ्यांनाच मार्केटमध्ये थांबण्याची परवानगी दिली. त्यानंतर बाजारपेठ बंद असल्याने किरकोळ विक्रेत्यांसाठी कव्हा रोडवर बंद दूकानांसमोर सुरक्षित सामाजिक अंतरानुसार व्यवस्था करून देत जागा वाटप केले. 

याचा परिणाम शनिवारी भाजीपालामार्केटमधील गर्दी काही क्षणात संपुष्टात आली. असाच प्रयोग दयानंद गेट परिसरातील भाजीपाला मार्केटसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी ईदगाह मैदान व दयानंद महाविद्यालयाचा परिसर ताब्यात (अधिग्रहित) घेण्यात आला असून त्या ठिकाणी फळे व भाजीपाला विक्रेत्यासाठी सुरक्षित सामाजिक अंतरानुसार व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे भाजीपाला व फळे खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर चांगलेच नियंत्रण येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण; ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्समध्ये वाढीचा परिणाम

Latest Marathi News Union Budget 2026 Live : अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही

Budget 2026 Tax Reform : या तारखेपासून नवा आयकर कायदा लागू! आयकर रिटर्न ची तारीख वाढविली, जाणून घ्या काय बदललं

Union Budget 2026 : अपघात विम्याच्या व्याजावर कोणताही कर नाही ! अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी 'सी-मार्ट' योजना; लखपती दीदींनंतर आता महिलांना कोणते फायदे मिळणार ते जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT