Raosaheb Danve Latur Zilha Parishad  
मराठवाडा

लातूरची जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात राहील, मंत्री दानवेंचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची आम्ही एकमताने निवड केली आहे. सोमवारी (ता.सहा) या पदासाठी निवडणूक होत आहे. भाजपचा यात कोणताही सदस्य फुटणार नाही. राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम होणार नाही. लातूरची जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात राहील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी (ता.सहा) निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेवर पक्षाची सत्ता आहे. या सर्वांचा आढावा घेणे, सर्व सदस्यांची चर्चा करण्यासाठी श्री.दानवे येथे आले होते. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो आहे. जिल्ह्यातील कोअर ग्रुपशी एकत्रित चर्चा केली आहे.

व्यक्तिगतही चर्चा करण्यात आली आहे. त्यांची मते जाणून घेतली आहेत. जिल्हा परिषदेत चांगले काम झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण असावा याची सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम होणार नाही. लातूरची जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्याच ताब्यात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या निवडणुकीत व काही पंचायत समितीच्या निवडणुकीत एक दोन मते फुटली आहेत. याची गंभीर दखल घेतली आहे. त्याचा अहवालही मागवून घेण्यात आला असून, संबंधितावर कारवाई करण्यात येत आहे. लातूरवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे श्री. दानवे म्हणाले.


राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे धोकेबाज सरकार आहे. या सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे राजीनामानाट्य जनतेने पाहिले आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. शिवसेना दबावाला बळी पडत आहे. शिवसेनेचा ढाण्या वाघ आता शेळी झाला आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता श्री. दानवे यांनी केली. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.


सर्व सदस्यांवर निलंगेकरांचे लक्ष
महापालिकेत दोन मते फुटल्याने सत्ता ताब्यातून गेली. याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, पक्षाचे नेते रमेश कराड आदी नेते प्रयत्न करीत आहेत. सर्वांना एका अज्ञातस्थळी ठेवण्यात आले आहे. त्याची जबाबदारी अरविंद पाटील निलंगेकर यांच्यावर देण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळीच या सदस्यांना जिल्हा परिषदेत श्री. निलंगेकर घेऊन जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT