वरूड बुद्रुक : रास्तळच्या धरणातील सांडवा फोडून सोडण्यात आलेले पाणी.  
मराठवाडा

रास्तळच्या धरणाला गळती 

गजानन सपकाळ

वरूड बुद्रुक (जि.जालना) -  जाफराबाद तालुक्यातील रास्तळ येथील धरणाच्या सांडव्याला शनिवारी (ता.१५) गळती लागल्याचे आढळून आले. त्यामुळे पोकलेनच्या साहाय्याने सांडवा फोडून त्यात चारी पाडून मोठ्या प्रमाणावर पाणी रविवारी (ता.१६) सोडून देण्यात आले. यामुळे खापरखेडा, खासगाव नदीला पाणी वाढायला सुरवात झाली आहे. 

जालना जिल्ह्यातील डोंगराच्या उताराला असलेल्या रास्तळ येथील धरणातील पाण्याचा फायदा हा येथील ग्रामस्थांना शेतीसाठी, गावासाठी होतो. यावर्षी पाऊस सुरवातीपासून चांगला असल्याने धरण भरून वाहू लागले आहे. त्यातच रास्तळ व वानखेडा गावातील ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा हा मुख्य स्रोत आहे.

हे धरण भरल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला; मात्र या धरणाच्या सांडव्याच्या भिंतीतून पाण्याला गळती लागल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. त्याअनुषंगाने संतोष जाधव, माजी सरपंच कडुबा शितोळे यांनी जिल्हा परिषदचे पाटबंधारे विभागाला संपर्क साधून ही माहिती दिली.

याची दखल घेत पोकलेनच्या साहाय्याने सांडवा फोडून त्यात चारी पाडून मोठ्या प्रमाणावर पाणी रविवारी (ता.१६) सोडून देण्यात आले. यामुळे खापरखेडा, खासगाव नदीला पाणी वाढायला सुरवात झाली. याबाबत जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस. एम. गुटे यांनी पाणीपातळी कमी करून गळती रोखण्यात येईल, असे सांगितले. 

झाडेझुडपे वाढल्याचा परिणाम 

दरम्यान, भिंतीवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून, त्यांच्या मुळ्या भिंतीमध्ये खोलवर गेल्याने आता पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊन आगामी काळात पाण्याअभावी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. उन्हाळ्यात धरणाच्या भिंतीवरील झाडे तोडून साफसफाई केली असती तर अशी घटना घडलीच नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT