Rajesh Tope
Rajesh Tope 
मराठवाडा

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीककर्ज द्या, राजेश टोपेंची सूचना

उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmer) पिकाच्या लागवडीसाठी पीककर्जाची (Crop Loan) आवश्यकता असते. परंतु, जिल्ह्यातील बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळत नाही. जिल्ह्यातील बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या पीककर्जाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला पीककर्ज मिळालेच पाहिजे, असे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे (Health Minister And Guardian Minister Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Jalna) सभागृहात पीककर्ज वाटपाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (IAS Vijay Rathod), जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख (IPS Vinayak Deshmukh), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे, यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थिती होती.(let available crop loan for farmers, rajesh tope directed banks in jalna glp88)

श्री. टोपे म्हणाले, चालू वर्षाच्या खरीप हंगामात जुलै महिना संपत आलेला असताना राष्ट्रीयीकृत, व्यापारी, ग्रामीण बँकांचे कर्जवाटपाचे प्रमाण अत्यल्प आहे. या सर्व बँकांनी कर्जवाटपाचा वेग वाढवावा. ज्या बँका त्यांना दिलेले पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांना प्रशासनामार्फत नोटिस बजावण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देत शासनाच्या विविध योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत बँकेच्या माध्यमातून पोहोचविण्यात येतो. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार या बँकांमार्फत करण्यात येत असल्याने बँकांना याचा मोठा लाभ होतो.

ज्या बँका पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील सर्व शासकीय ठेव काढून घेण्याबरोबरच शासनामार्फत कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात येणार नसल्याचा इशारा श्री. टोपे यांनी दिला. जिल्ह्याला खरीपाच्या पीककर्जाचे ११७९ कोटी ५२ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असून आतापर्यंत बँकांनी ८४ हजार शेतकऱ्यांना ३८९ कोटी ५८ लाख म्हणजेच केवळ ३८ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे, यासंदर्भात नाराजी व्यक्त करत बँकांनी अधिक जलदगतीने पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना ही श्री. टोपे यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT