फोटो 
मराठवाडा

परवाना देशीचा मात्र विक्री विदेशी 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : देशी दारु परावानाधारक असलेल्या एकाच्या ताब्यातून ३५ हजाराचा विदेशी दारुचा साठा जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तरा (ता. हदगाव) शिवारात मंगळवारी (ता. २१) रात्री नऊच्या सुमारास केली. यावेळी आरोपीला हदगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा व शहरामधील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेउन त्यांना अटक करावी अशा कडक सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाला हदगाव तालुक्यात गस्त घालण्यास पाठविले. हे पथक शासकिय वाहनाने हदगाव परिसरात गस्त घालीत असताना श्री. भारती यांना दारु साठ्याबद्दल माहिती मिळाली.

हेही वाचा पीरबुऱ्हाणचा पाच किलोमीटर परिसर सील
 
विनोद उर्फ बापा शिरोशियाला अटक

या माहितीच्या आधारे श्री. भारती हे आपल्या पथकासह हस्तरा (ता. हदगाव) येथील एका शिवारातील एका आखाड्यावर गेले. यावेळी त्यांनी विनोद उर्फ बापा शिरोशिया ( ३५) रा. निवघा बाजार याला ताब्यात घेतले. विनोद शिरोशिया हा अधीकृत देशी दारु विक्री करणारा डीलर आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या काळात दारु दुकाने बंद असल्याने त्याने वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारुचा साठा आपल्या शातात ठेवून तो तेथून विनापरवानगी विकत होता. 

३५ हजार ५६३ रुपयाची विदेशी दारु 

पोलिसांनी त्याच्याकडून ३५ हजार ५६३ रुपयाच्या विविध कंपनीच्या विदेशी दारु साठा जप्त केला. दारु साठा व त्याला सोबत घेऊन हदगाव पोलिस ठाण्यात पोहचले. मुद्देमाल व आरोपी याला हदगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरुन हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हातभट्टीसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त 

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नांदेड : मुदखेड व भोकर तालुक्यात केलेल्या कारवाईत हातभट्टीसह दोन लाखाचा मुद्मेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. २१) सायंकाळच्या सुमारास केली.  

मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा, वरदडा तांडा आणि भोकर तालुक्यातील किनी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी कारवाई केली. यावेळी तीन्ही ठिकाणाहून दहा आरोपींना अटक केली. तर १६ गुन्हे दाखल केले. यापैकी सहा जण पोलिस दिसताच मुद्देमाल सोडून पसार झाले. अटक केलेल्या आरोपीकडून ९० लीटर हातभट्टी, पाच हजार १०० लीटर रसायन आणि एक जुन्या वापरातील दुचाकी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

यांनी घेतले परिश्रम

जिल्हा अधिक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. खंडेराय, एस. एम. बोदमवाड, पी. ए. मुळे, पी. जी. कदम, टी. डी. शेख, ए. के. शिंदे, वाय. एस. लोने, के. के. किरतवाड, व्ही. टी. खिल्लारे, बालाजी पवार यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT