File photo 
मराठवाडा

Video-लॉकडाउन : दिव्यांग झाले सैरभैर, रोजच करावा लागतोय जगण्यासाठीचा संघर्ष

प्रमोद चौधरी

नांदेड : दिव्यांगांनाही इतरांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून असंख्य शासकीय योजना आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत त्या पोचत नसल्याने दररोजच त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दररोज रेल्वे, बसस्थानकावर तसेच शहरांमध्ये भीक्षा मागून हे दिव्यांग दिवस काढत आहेत. मात्र, हा संघर्ष लॉकडाऊनमुळे अधिक तीव्र झाला असून, मदतीसाठी ते शहरात सैरभैर फिरताना दिसत आहेत.

कोरोना महामारी विषाणुला हरविण्यासाठी अख्खं जग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. शासन, स्थानिक जिल्हा, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे. या विषाणचा फैलाव होवू नये म्हणून देश लॉकडाउन केला आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक वगळून सर्व दुकाने, रेल्वे, बस वाहतूकही बंद आहे. त्यामुळे दररोज भीक्षा मागून दिवस काढणाऱ्या दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यापर्यंत अद्यापही मदत पोहचू शकली नाही, ते मदतीसाठी शहरभर सैरभैर फिरताना दिसत आहे. 

मानवजातीला लागलेला एक शाप म्हणजे शारीरिक, मानसिक विकलांगता ही भावना आता कालबाह्य झाली आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग असे संबोधण्यात यावे असं आवाहन जनतेला केलं; पण फक्त अपंग न म्हणता दिव्यांग शब्दाचा वापर करून त्यांचे सर्व भागेल असं होतं का? असा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे शारीरिक आणि मानसिकरित्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींची मनं ही सामान्य व्यक्तींपेक्षा कणखर असतात.  त्यांच्यामध्ये संयम, जिद्द आणि चिकाटी या त्रिसुत्रीतूनच ते आपले आयुष्य जगत असतात. 

दिव्यांग व्यक्ती ही शिक्षण तसेच विविध विषयांमध्ये अनेक कलेमध्ये पारंगत असतात. सामान्यांपेक्षा दिव्यांगांमध्ये सकारात्मक मानसिकताही मोठी असते. विशेष म्हणजे दूरदृष्टीने विचार करणारी बुद्धी देखील त्यांच्याजवळच असते.  प्रत्येक वेळी दिव्यांगांच्या वाट्याला अडचणी या येतच असतात. तरीदेखील मनात जिद्द, संयम ठेवून आपले ध्येय ते गाठतात. मात्र, त्यांना कुचेष्टेचा विषय करून अनेक ठिकाणी डावलण्याचे प्रकार घडतात. 

दिव्यांग, गरिब मागासवर्गीय यांना जोपर्यंत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही तोपर्यंत ते कोणत्याही कामाला 'फिट' होऊच शकणार नाहीत. दिव्यांगांचे प्रश्न शासनापर्यंत पोचतात, पण मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचर्यांमुळे त्यांचे प्रश्‍न अधिकच गुंतागुंतीचे होत आहेत. परिणामी त्यांना सन्मानाने जगणे तर दूरच आहे; पण त्यांच्या जगण्याचे प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालले असून लॉकडाउनच्या काळात ते अधिक तीव्रतेने होताना दिसत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'५५५ बीडी'च्या मालकाची मुलानेच केली हत्या, गोळी झाडून घेत स्वत:लाही संपवलं; काय घडलं?

Bengaluru Doctor Case : मी तुझ्यासाठी तिला मारलं, पत्नीच्या हत्येनंतर लग्नाचे प्रस्ताव नाकारलेल्या महिलांना केले मेसेज

Latest Marathi News Live Update : करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोलच्या मालमत्तेवर कारवाई

Dry Eye Risk in Youth: डिजिटल युगात डोळ्यांवर येणाऱ्या ताणामुळे तरुणाईंला 'Dry Eye'चा धोका! शरीरात हे बदल दिसताच करा पुढील उपाय

Zubair Hungregkar Case: जुबेर हंगरेगकरचे ‘अल कायदा’शी संबंध प्रकरण! ‘वाहदते मुस्लिम ए हिंद’च्या पदाधिकाऱ्यास एटीएसची नोटीस, चौकशी होणार..

SCROLL FOR NEXT