File Photo 
मराठवाडा

लॉकडाउन: नांदेडकरांना दिलासा... दुसऱ्या टप्यात मास्क वापरणे बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात बुधवारी (ता.१५ एप्रिल २०२०) संध्याकाळपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत एकूण क्वारंटाइन ५०३, तर क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणाऱ्यांची संख्या १४० इतकी आहे. निरीक्षणाखाली असलेल्या व्यक्तींची संख्या ४३ आहे. त्यापैकी दवाखान्यात (यात्रिनिवास) क्वारंटाइनमध्ये ३९ जण आहेत. घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले ५०३ जण आहेत. आज तपासणीसाठी सर्वाधिक ४२ जणांचे स्वॅब नमुने घेतली. एकूण २७४ नमुने तपासणी पैकी २२६ निगेटिव्ह, तर ४३ जणांचे नमुने तपासणी अहवाल बाकी आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवाशांची संख्या ७३ हजार ६७९ असून, त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले असल्याची माहिती नांदेड जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारपर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळला नसला तरी, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करावे, कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक कामाच्या ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये, तसेच लग्न आणि अंत्यसंस्काराच्या वेळीदेखील जास्त लोक एकत्र येणार नाहीत याची सर्वती खबरदारी घ्यावी, अशा आरोग्य विभागाने सूचना दिल्या.

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

जिल्हा दंडाधिकाऱ्याने नियमन करावे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा, तसेच दारू, गुटखा आणि तंबाखू अशा आमली पदार्थांची विक्री करण्यावरदेखील बंदी घालावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. 

नियमावलीच्या आधारे भाजी मार्केट सुरु

याशिवाय सिनेमागृह, स्विमिंगपूल, हॉटेल, जिम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, अशी गर्दीची ठाकाणे ता. तीन मे २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशदेखील यामध्ये देण्यात आले आहेत. या सोबतच सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरोग्य खात्याने घालून दिलेल्या नियमावलीच्या आधारे भाजी मार्केट, मंडी स्पेशल परवान्याच्या आधारे चालू राहतील, असे सांगण्यात आले आहे. देशात आणि महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नांदेडकरांनादेखील तोंडावर मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 1st ODI: पावसाचा खोडा... भारत-अफगाणिस्तान मॅच केव्हा सुरू होणार? BCCI ने दिले अपडेट्स; सामना रद्द होणार?

Navi Mumbai Electricity: अंधारात बुडालं खारघर, हजारो कुटुंबाचे हाल; अचानक वीज गेल्यानं लिफ्टमध्ये अडकले तरुण तरुणी

Latest Marathi News Live Update : पक्ष काँग्रेसमध्ये विलनी करण्याऐवजी भाजपा सोबत या, रामदास आठवलेंचा राष्ट्रवादीला प्रस्ताव

Sangli Rain Update : घाईघाईत पेरणी करताय? सांगली कृषी विभागाचा शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; 'एवढा' पाऊस झाल्याशिवाय पाऊल उचलू नका!

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

SCROLL FOR NEXT