file photo 
मराठवाडा

लॉकडाउन : मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, कशासाठी? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : आज परिस्थिती अतिशय स्फोटक, विध्वंसक व विघातक आहे. अशा स्थितीत मनाला शांत व समाधानी ठेवणे, परिस्थितीनुरूप बदल करणे, मनावर नियंत्रण ठेवणे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक समजून कार्यरत राहणे व मनाचे स्वास्थ्य, आरोग्य सांभाळणे व ते टिकवून ठेवणे यातच खरी मनाची निरोगीता, कार्यक्षमता व मनाची शांती सामावलेली आहे. 

मन स्वास्थ्यासाठी काय करावे?
आज मनाला सक्षम ठेवणे, सदृढ निकोप व निरोगी ठेवणे खूप कठीण व आवघड आहे. ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ हे जरी खरे असले तरी, मनावर नियंत्रण राहत नाही. माणसाच्या बुद्धीला मानवी हृदयाच्या भाव-भावनांची साथ नसेल तर मानवाचा विनाश झाल्याशिवाय राहात नाही. मानवाने मानवाशी मानवासारखे वागणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या भावनांचा विचार करणे, विघातक व रचनात्मक कामात गुंतणे, समाजाच्या हितार्थ झटणे व समाजशील वृत्ती जोपासणे, समाजाचे आपण काही देणं लागतो, ही भावना उराशी बाळगून समाजाप्रती आस्था, सहानुभूती राखणे अशा प्रकारच्या कार्यातून व सहभागातून मनाला स्वस्थ्य ठेवता येते. 

मनाला चांगल्या विचारांची जोड हवी
यासाठी मनाची तयारी हवी. मन सक्षम-सुदृढ हवे. मनाला खंबीर ठेवून चांगले ते करणे, वाईट ते सोडून देणे व मनाला सतत चांगल्या कामात गुंतून ठेवणे अशा कृती व कार्याने निश्चितपणे मनाचे स्वास्थ्य उत्तम व चांगले राहील. मनाला सतत चांगल्या विचारांची जोड दिली, सत्संगाची साथ दिली व सातत्याने मनाला चांगल्या कामात गुंतविले तर चांगल्या दूरदृष्टीची व कार्याची पायाभरणी होईल व मन स्वस्थ, शुद्ध व निकोप राहील.

थोरांचे विचार मनावर बिंबवा
महान साधूसंत-संतपुरुष यांनी नेहमीच जनकल्याणाचा विचार केलेला आहे. त्यांचे विचार, त्यांचे लेखन साहित्य, श्लोक, अभंग व भक्तीगीत, प्रवचन व प्रबोधन यापासून समाजात काही प्रमाणात स्वस्थता व शांतता आहे. अशा या महान व थोर साधूसंतांचे विचार वारंवार मनावर बिंबवले तर मनाची स्वस्थता टिकून राहण्यास मदत होईल. यातूनच मनाची स्वस्थता जोपासल्या जाऊ शकते. चांगल्या मनात चांगले विचार वसतात. चांगल्या कृतीतून चांगली मने साकारतात.  

मनाला चांगल्या कामात गुंतवावे
यासाठी समाजातील लहानथोर, दीनदुबळे, गरीब-श्रीमंत या सर्वांनी आपल्या मनाला समाजातील चांगल्या कामातच गुंतवावे. वाईट काम, व्यसन, विकार, विधायक वृत्ती यांचा लवलेशही मनात येऊ नये, असा ठाम निर्णय घ्यावा. सदा न कदा चांगल्या बाबींचाच विचार करावा, म्हणजे मनाला चांगल्या बाबींची सवय जडते व विधायक कामे पार पडतात. सर्वात महत्त्वाचे मनाची स्वस्थता टिकून राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT