hingoli photo 
मराठवाडा

लॉकडाउनमुळे कापड व्यावसायिक हतबल

संजय बर्दापुरे

वसमत (जि. हिंगोली) : बेरोजगारीमुळे अनेकांनी मिळेल त्या बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायात करिअर करण्याच्या उद्देशाने कापड, रेडिमेट दुकाने थाटली आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे लग्न सोहळे रद्द झाल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. आता त्‍यांच्यासमोर व्याजाच्या बोजासह दुकानांचा किराया व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सोडवायचा, असा सवाल कापड व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

अनेक तरुणांनी नोकरी मिळविण्यासाठी खेटे मारून पदरी निराशा पडल्यानंतर निरनिराळ्या व्यवसायाला जवळ केले आहे. त्यातच वसमतचा बाजार हा कापड व रेडिमेडसाठी नावाजलेला असल्याने बहुतांश तरुणांनी कापड व रेडिमेडची दुकाने थाटली आहेत. यासाठी नव व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागली. 

व्यवसायासाठी लाखोंचा खर्च आला

मुख्य बाजारपेठेत दुकान घेण्यासाठी त्यांना पाच ते दहा लाखांपर्यंतची पगडी, मिळेल त्या बँकेचे कर्ज, दहा ते वीस हजार रुपयांपर्यंतचा दुकानाचा किराया, फर्निचर, नोकर आदींची मोट बांधताना लाखोंचा खर्च आला आहे. या व्यवसायाचे सर्वात मोठे सिझन म्हणजे लग्नसराई. या सिझनमध्ये उभारी देऊन जाते. 

दुकानाला लागले लॉक

परंतु, ऐन लग्नसराईत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्याने व्यवसायाला गती येण्याअधिच दुकानाला लॉक लागले. परिणामी नफा कमावून आर्थिक गाडी रुळावर आणणे सोडा; हजारो रुपयांचे दुकान भाडे, लाईटबिल व लाखो रुपयांच्या कर्जाचे व्याज या व्यावसायिकांवर बसले आहे. 

कमाई होईल ही आशाच संपुष्टात

त्यामुळे छोटे कापड व रेडिमेड व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे. मिळेल तो पैसा टाकून उभारलेल्या व्यवसायातून कमाई होईल ही आशाच संपुष्टात आली आहे. येणाऱ्या काही दिवसांत सदरील दुकाने सुरू न झाल्यास कायमची बंद पडतील, अशी चिन्ह आहेत.

सर्वच अर्थकारण बिघडले

लग्नसराईचे दोन महिन्यांचे सिझन कापड आणि रेडिमेड व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे ठरते. परंतु, लॉकडाउनमुळे सर्वच अर्थकारण बिघडले आहे. येत्या दोन - तीन दिवसांत दुकाने सुरू न झाल्यास अनेकांच्या दुकानांना कायमचे टाळे लागतील.
- नारायण पवार, रेडिमेड दुकानदार, वसमत


कपडा, रेडीमेड गारमेंट दुकाने सुरू करा

हिंगोली : जिल्‍ह्यात कपडा, रेडीमेड गारमेंट, पादत्राणे, भांडे, प्रिंटिंग प्रेस सुरू करण्याची मागणी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे मंगळवारी (ता. २६) एका निवेदनाद्वारे केली आहे.

येथे क्लिक कराखताची टंचाई भासणार?

व्यापारी संघटनेची मागणी

या बाबत व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नेनवाणी यांनी निवेदन दिले आहे. प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. दरम्‍यान, जिल्‍ह्यात अत्यावश्यक गरजेची प्रतिष्ठाणे उघडल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेली आहे. 

नियम घालून परवानगी देण्यात यावी

जिल्‍ह्यातील अनेक वस्‍तूंच्या विक्रीची प्रतिष्ठाणे उघडी करून दिली आहेत. त्‍याच प्रमाणे कपडा, रेडीमेड गारमेंट, पादत्राणे, भांडे, प्रिंटिंग प्रेस या अस्‍थापनाही सुरू करण्यास सशर्त अटी व नियम घालून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT