जालना : नूतन वसाहत येथील उड्डाणपूल परिसरातील शुकशुकाट.
जालना : नूतन वसाहत येथील उड्डाणपूल परिसरातील शुकशुकाट. 
मराठवाडा

जालना शहरात काटेकोर लॉकडाउन 

सकाळ वृत्तसेवा

जालना - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जालना शहरात लागू करण्यात आलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाउनचा बुधवारी (ता. आठ) तिसरा दिवस होता. शहरात कडकडीत बंद दिसून आला. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह शहरात दुचाकीवर गस्त घालत लॉकडाउनची पाहणी केली. 

जालना शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नगसेवकांच्या बैठकीनंतर दहा दिवसांचे कडकडीत लॉकडाउन लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रविवारी (ता. पाच) रात्री बारा वाजेपासून शहरात कडकडीत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. बुधवारी (ता. आठ) अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दुचाकीवरून शहरात गस्त घालत पोलिस बंदोबस्तांची पाहणी केली. दरम्यान, शहरातील विविध भागांत पोलिस प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही लक्ष ठेवले जात आहे. परिणामी या लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. 

शहरात आरोग्य विभाग व नगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांचीही या पथकाकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी शहरातील मामा चौक येथे पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोग्य पथकाकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

जिल्ह्यात आतापर्यंत लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी ९१२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; तसेच ८५१ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर एकूण सहा लाख ७१ हजार २३८ रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT