फोटो 
मराठवाडा

लॉकडाउन : न्यायदानासोबतच ‘याही’ कामात उडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना या महाभयंकर आजाराने जगाला मेटाकुटीला आणले आहे. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या ता. तीन मे पर्यंत लॉकडाउन आहे. यामुळे अनेक गरीब व गरजू लोकांचा रोजगार बुडत असल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. अशात न्यायालयानेही मदतीचा हात पुढे केला आहे. २०० हून अधिक कुटुंबाना न्यायालयाच्या वतीने अन्न- धान्याच्या कीटचे वाटप करण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी या पवित्र कामासाठी पुढाकार घेतला होता. 

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनचा फटका सर्वांनाच सला आहे. त्यात सर्वाधीक फटका हातावर पोट असलेल्यांना बसत आहे. अजून तीन मेपर्यंत हा लॉकडाउन असल्याने अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. अशा गरीब व गरजू नागरिकांच्या चुली पेटाव्यात म्हणून अनेक समाजसेवी संस्था, राजकिय मंडळी, दानशुर व्यक्ती आपल्या संपत्तीतील काही वाटा या संकटसमयी गरीब कुटुंबावर खर्च करीत आहेत. ही बाब खऱ्या अर्थाने अभिमानाची आहे. संकट काळी जो धावून येतो तोच खरा समाजसेवक म्हणून ओळखल्या जातो.

संकटकाळी न्यायालयसुद्धा धावले मदतीला 

मात्र भावनेवर न चालणारे न्यायालयसुद्धा या संकटकाळी शासनाच्या आवाहनाला साथ देत मदतीचा हात पुढे करत आहे. नांदेड जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या पुढाकारातून अनेक गरजुंना अन्‍नधान्य वाटप करण्यात आले. न्यायादानासोबतच या मदतीच्या पवित्र कार्यातही न्यायालय पुढे असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे न्यायालयाने ६० गरजु वकिलांना व १५ न्यायालयीन कर्मचाऱ्यांना तसेच काही गरीब कुटुंबांना अन्नधान्याची कीट दिली. या मदतीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता. 

यांची होती उपस्थिती

मदत वाटपाच्या वेळी जिल्हा न्यायालय प्रांगणात मुख्य न्यायाधीश सतिश हिवाळे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्र रोटे, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी, माहूर येथील रेणूका देवस्थानचे पदाधिकारी, न्यायीक अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. न्यायाधीश धोळकिया यांनी देशावरील आलेले संकट लवकरच जाईल यासाठी आपण लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा, घरातच थांबा आणि सुरक्षीत रहा असा संदेश त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT