corona 
मराठवाडा

‘लॉकडाऊन’मुळे शेजारीच बनले नातेवाइक....

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः ‘कोरोना’चे संकट व लॉकडाऊनमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. कुणाच्या घरी जायचे नाही, नातेवाइकाकडे देखील ये-जा बंदच झाली आहे. त्‍यामुळे केवळ फोनवर त्‍यांची खुशाली विचारली जात आहे. बाहेरगावी मुले असली तरी त्‍यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट करता येत नाही. मुलांचीही अवस्‍था तर इतर नातेवाईकांच्या बाबतही हा नियम लागू झाला आहे, अशा वेळी शेजारी राहणारेच नातेवाइक बनल्याचा अनूभव अनेकांना येत आहे. 

नेहमीच नात्याचा गोतावळा व नातेवाइकांच्या कार्यक्रमात रमणाऱ्या आता ‘कोरोना’च्या संकटात केवळ शेजाऱ्यांच्याच आधार मोठा वाटू लागला आहे. माणूसकीची मदत प्रत्‍येकाला नवा धडा देणारी ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये नातेवाईक केवळ फोनवर तर शेजाऱ्याची सगळी मदत मिळाल्याचा अनुभव येत आहेत.

अनेक नवीन प्रश्न झाले निर्माण 
‘कोरोना’ संकट व लॉकडाऊनमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. कुणाच्या घरी जायचे नाही, नातेवाइकाकडे देखील ये-जा बंद झाली आहे. त्‍यामुळे नातेवाइकांना फोनवर त्‍यांची खुशाला विचारली जात आहे. बाहेरगावी मुले असली तरी त्‍यांना काळजी घेण्याच्या सुचना देण्याशिवाय इतर कोणत्या गोष्टी करता येईना झाल्या आहेत.

किरकोळ गोष्टींसाठी मिळतेय मदत
छोटी मुले घराबाहेर पडली तर शेजारी लगेच त्‍यांना आवरण्याचे सांगतात. भाजीपाला आला तर शेजाऱ्यांना आवाज देवून भाजी घेण्याची सूचना दिली जात आहे. कॉलनीतील सर्व रहिवाशी या संकटाने एकत्र येवून स्‍वच्‍छता ठेवण्याचे प्रयत्‍न करीत आहेत. कुणी आजारी असेल तर कॉलनीतील शेजारी राहणारे डॉक्‍टर औषधी लिहून देतात. काही नागरिकांनी आता कॉलनीतील लोकांचे व्हॉटसपॲपचे ग्रुप देखील केले आहेत. घरातील कोणती वस्‍तू संपली तर शेजाऱ्यांना सांगून ती उपलब्ध केली जात आहे.


कॉलनीची स्‍वच्‍छता ठेवण्याचा निर्णय
कोरोनाच्या संकटात सर्व शेजाऱ्यांना एकत्र येवून कॉलनीची स्‍वच्‍छता ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच कॉलनीत येणारे रस्‍ते बाहेर गावातून येणाऱ्यासाठी बंद केले आहेत. कोणतेही प्रश्न असल्यास ते शेजाऱ्यांना बोलूनच सोडविले जात आहेत. -विनायक देशमुख. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Pune Court Verdict : १५ वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा निकाल; आरोपीला जन्मठेप!

१ लाख कर्जाचं ७४ लाख कसे झालं? व्याजाचा आकडा हादरवणार, सावकारानं किडनी विकायला लावल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट...

Akola Election : निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी नको- मनपा आयुक्त डॉ.लहाने; निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक!

Latest Marathi News Live Update : आयआयटी मुंबई मूड इंडिगो कार्यक्रमात विद्यार्थ्यांची तुफान गर्दी

SCROLL FOR NEXT