kinwat.jpg 
मराठवाडा

लॉकडाऊनमध्ये सर्व नियमांचे पालन आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

किनवट, जि. नांदेड : जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी किनवट येथे दिलेल्या भेटी दरम्यान विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

किनवटच्या तयारी बाबत घेतली माहिती
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये या करीता देशात लॉकडाऊन आणखी १९ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी बुधवारी (ता. १६) किनवट तालुक्याला भेट देऊन किनवट प्रशासनाकडुन करण्यात आलेल्या उपययोजनांची पाहणी केली.

परप्रांतीय नागरिकांची घेतली भेट
किनवट तालुक्याला असलेल्या विदर्भ व तेलंगणा राज्याच्या सिमावरील चेक पोस्टची पाहणी केली तसेच किनवट शहरात नविन तहसिल इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या कोरंटाईन कक्षास भेट दिली. किनवट शहरात ७२ परप्रांतीयांची ज्या ठिकाणी प्रशासनाने राहण्याची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणाची पाहणी केली. किनवट प्रशासनातील सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार नरेंद्र देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, उपविभागिय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. काळे व आरोग्य कर्मचारी श्रीकांत माने यांनी केलेल्या एकूण उपायोजना व नियोजनाची जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी कौतुक केले आहे. 

प्रवाशी नागरीकांना शासकीय कोरोनटाईन करा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आरोग्य विभाग व महसुल प्रशासनाला सुचना दिल्या. यात एक उत्कृष्ठ हॉस्पिटल उभारण्याची गरज आहे. त्याची उभारणी तत्काळ करण्यात येईल. जे नागरीक आता बाहेर ठिकाणावरुन शहरात व गावात येत आहेत, त्यांना होम कोरोनटाईन न करता त्यांना शासकीय कोरोनटाईन कक्षात व उपजिल्हा रुग्णालयात १४ दिवस कोरंटाईन बंधनकारक करावे.

शिवणीचा रुग्ण निगेटीव्ह
शिवणी येथील संशयीत रुग्ण हा निगेटिव्ह निघाल्याने किनवट तालुक्याकरीता आनंदाची बातमी आहे. तरी त्याची दुसरा तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. किनवट तालुक्यातील घनपूर फाटा या चेक पोस्ट असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमा भाग आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमा भागास भेट देवून पोलीस प्रशासनास तत्पर राहण्याच्या सूचनाही डॉ. विपीन यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेची प्रभाग रचना आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

Pune News : पूर्ण व्यवहार रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार; आचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांचा इशारा

Lightning Strike : गेवराईत वीज पडल्याने दोन शेतमजूर महिला जखमी

Electricity Shock : एमआयडीसीत सेल्को एक्स्ट्रुजन कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Shreyas Iyer बरा होतोय...! ICU मधून बाहेर, वाचा काय आहेत नवे अपडेट्स

SCROLL FOR NEXT