File photo 
मराठवाडा

लॉकडाऊन : अभ्यासासोबतच प्रेरणादायी पुस्तकांचेही वाचन

प्रमोद चौधरी

नांदेड : मातृत्व अथवा पितृत्व ही तर निसर्गाची देण. पण साजाण पालकत्व मात्र प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. बालसंगोपन क्षेत्रात खूप संशोधन झाले आहे. आपल्याला जसे वाढविले गेले, त्याच पद्धतीने जर मुलाला वाढविले तर पदरी निराशा पडण्याचा संभव आहे. कारण काळ झपाट्याने बदलत असल्याने अनेक समस्या तयार झालेल्या आहेत. या समस्या कशा सोडवायच्या, याचा मार्गच अनेक पालकांना सापडत नाही.

मात्र, अशा पालकांना मुलांमध्ये बदल पाहिजे असतो. काही पालक मुले जसजसे मोठे होईल तसतशा समस्या आपोआप सुटतील, चिंता करायची गरज नाही, अशा चुकीच्या विचारात असतात. अनेक पालक मुलाला थेट कृती करायला सांगत असतात. मात्र, यातून काही इनपुट निघत नाही. शेवटी निराशा पदरी पडते. त्यासाठी मुलांकडून इनपुट््स हवे असतील तर तसे संस्कार (उदा. उभ्यासाचे महत्त्व, खेळाचे महत्त्व आदीं) त्यांच्या मनावर होणे गरजेचे आहे. 

बालविकासामध्ये पहिली सहा वर्षे सगळ्यात महत्त्वाची आहेत. याकालावधीत मुले ९० टक्के हे अनुकरण व अनुभवातून शिकत असते. फक्त दहा टक्के शिक्षण हे पालक बोलतात, त्यातून शिकले जाते. पालकांची तक्रार असते की, खूप समजावून सांगितले, पण ऐकतच नाही. तो ऐकणारच नाही. कारण त्याच्या शिक्षणाचा फक्त दहा टक्के भागच ऐकण्याने येत असतो.

पालकांनी आत्मपरीक्षण करावी
आपले मुल सुदृढ, गुणवान व्हावे, असे कोणाला वाटणार नाही? पण त्यासाठी मुलाला त्या गोष्टीचे, गुणाचे माॅडेल द्यायला हवे. तरच त्याचा प्रभाव पडेल. नुसते सांगून प्रभाव पडणार नाही. वडील र सकाळी आठ वाजता उठत असतील, जेवताना किरकिर करत, ताटात अर्धवट टाकत असतील, पत्नीशी भांडत असतील तर त्याचा मुलांवर काय संस्कार होईल? याचे पालकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

शिक्षा वर्तनावर असावी
उत्तव सवयी, शिस्त लावायची म्हणजे काही प्रमाणात शिक्षा आलीच. शिक्षेचे काही नियम पाळले तर ती उत्तम निकाल देऊ शकते. शिक्षा ही शारीरिक नसावी. ताबडतोब असावी. गुन्हाचे प्रमाणात असावी. वडिलांच्या मूडवर नसावी. शिक्षा त्याच्या वर्तनावर असावी. मुलांवर नसावी. पालकांच्या स्वभावावरून (१) प्रेमळ व डळमळीत (२) प्रेमळ व खंबीर (३) कठोर व खंबीर (४) कठोर व डळमळीत अशा चार गटांती वर्गीकरण करता येईल.
- डाॅ अश्विनी एस. देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

SCROLL FOR NEXT