imtiyaz jaleel
imtiyaz jaleel 
मराठवाडा

Loksabha 2019 : ‘एमआयएम’चा आज फैसला

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली असताना दुसरीकडे वंचित आघाडीकडून ‘एमआयएम’चा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरावयाचा की नाही, यावर सोमवारी (ता. २५) हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय दारुस सलाम येथे अंतिम फैसला होणार आहे.

वंचित आघाडीकडून अगोदर बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर एमआयएमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टोकाचा विरोध करीत ही जागा एमआयएमला सोडण्यास भाग पाडले. या जागेसाठी आमदार इम्तियाज जलील यांनीच मैदानात राहावे, असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार आग्रह धरला. इतकचे नव्हे; तर पक्षाच्या निरीक्षकांच्या यादीतसुद्धा आमदार इम्तियाज जलील यांचेच नाव पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे गेले आहे; मात्र काही जणांनी एमआयएमने लोकसभा न लढता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना केल्याने उमेदवार घोषित करण्यासाठी उशीर होत आहे. काँग्रेस, शिवेसना उमेदवार घोषित झाल्यानंतर एमआयएममधील काही जणांनी आकडेमोड सुरू केली आहे. आमदार इम्तियाज जलील हेच मजबूत उमेदवार आहेत. 

त्यांच्याव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही उमेदवार देऊ नये, असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आता याचा फैसला सोमवारी होणाऱ्या बैठकीत होईल.

एमआयएमने ही जागा न लढता ती वंचित आघाडीला सोडावी, असा पक्षातील काही जणांचा सूर आहे. त्यामुळे वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी माजी खासदार उत्तमसिंग पवार हेसुद्धा इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा भेट घेतली आहे; पण सोमवारी हैदराबादेत होणाऱ्या बैठकीतच वंचित आघाडीचा उमेदवार की एमआयएमचा यांचा अंतिम निर्णय होईल.

पक्षाचा निर्णय मान्य राहील - जलील 
पक्षाचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची हैदराबादेत सोमवारी सकाळी ११ वाजता पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यामध्ये ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील. आमची निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी आहे. पक्षाचे अध्यक्ष जो आदेश देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल असे इम्तियाज जलील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT