Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi esakal
मराठवाडा

Parbhani : नाट्यमय घडामोडीनंतर सभापतिपदावरही 'मविआ'चंच वर्चस्व; प्रतिष्ठेच्या लढतीत मारली बाजी

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट), भाजप व कॉँग्रेसही मैदानात होती.

परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Parbhani Election) रंगीत तालीम म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांकडे पाहिले गेले. या मुळेच या निवडणुकांना महत्त्व प्राप्त होऊन सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या.

जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीसाठी (Krushi Utpanna Bazar Samiti Election) जोर लावला होता. त्याचा परिपाक म्हणून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांना या निवडणुका सहज जिंकता आल्या. आता सभापतिपदावरही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचाच वरचष्मा दिसत आहे.

सोमवारी जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत दोन ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सभापती झाले तर परभणी येथे मात्र ठाकरे गटाचा सभापती विराजमान झाला आहे. परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी १० बाजार समितीच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत.

एकमेव मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. उर्वरित बाजार समित्यांवर महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाकडे सर्वांचे लक्ष लागून होते; कारण या बाजार समिती निवडणुकीच्या वेळी अनेक नाट्यमय घटना घडल्या होत्या. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला होता.

त्यामुळे या ठिकाणी ठाकरे गट व कॉँग्रेस या दोन पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्याचवेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी सभापती ठाकरे गटाचा होणार असल्याचे घोषित केले होते. ठरले त्याच पद्धतीने ठाकरे गटाचे पंढरीनाथ घुले यांची सभापतिपदी निवड झाली. कॉँग्रेसचे अजय चव्हाण हे उपसभापतिपदी निवडल्या गेले. पाथरी बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सय्यद खान यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आव्हान दिले होते. परंतु, आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचा करिष्मा कायम ठेवत १२ उमेदवार विजयी केले.

त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे बहुमत असल्याने राष्ट्रावादी कॉँग्रेसचे अनिल नखाते यांची सभापतिपदी निवड झाली. उपसभापतिपदी श्याम धर्मे याची निवड झाली. सोनपेठ बाजार समितीच्या निवडणुकीत राजेश विटेकरांनी त्यांचा प्रभाव कायम ठेवला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट), भाजप व कॉँग्रेसही मैदानात होती. परंतु, या सर्वांना पराभूत करत सर्वच्या सर्व १८ उमेदवार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विजय झाले. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दशरथ सूर्यवंशी हे सभापतिपदी तर उत्तम जाधव यांची उपसभापतिपदी निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT