Umarga Crime
Umarga Crime  sakal media
मराठवाडा

उमरगा पालिकेतील पावणे दोन कोटी अपहार प्रकरणी वडमारेंना अटक, कारवाईला विलंब

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पालिकेत विविध योजनेतील पावणे दोन कोटी  रुपयाच्या अपहार प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर उस्मानाबादच्या (Osmanabad) आर्थिक गुन्हे शाखेने विलंबाने कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एकुण सहापैकी चार आरोपींना दीड वर्षात टप्प्याटप्प्याने अटक करण्यात आली होती. आता अडीच वर्षानंतर पालिकेचे लेखापाल याला अडीच वर्षानंतर अंबाजोगाई येथून सोमवारी (ता. सात) रात्री अटक करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारी (ता.आठ) न्यायालयाने वडमारे यांना ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.उमरगा (Umarga) पालिकेत पहिल्यांदा ४९ लाखांच्या अपहार प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. (Man Arrested For Money Laundering In Umarga Municipal Council)

त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटी झाली. पालिकेचे तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण यांच्यासह सचिन काळे, पवन बाबुराव मात्रे - सोमवंशी व नंतरच्या तपासात नंदकुमार झांबरे अशा सहा जणांची नावे अपहार प्रकरणात समोर आली होती. या प्रकरणात पहिल्यांदा कंत्राटी कर्मचारी ढवळे याला २२ ऑक्टोबर २०१९ ला अटक झाली होती. नऊ महिन्याने दोन जून २०२० रोजी सचिन काळे, सुरज चव्हाण यांना अटक केली होती. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असलेल्या पवन मात्रे याला २३ मार्च २०२१ रोजी सोलापूर (Solapur) येथून अटक करून पोलिसांनी त्याच्याकडील कारही जप्त केली होती. श्री.झांबरे यांनी अटकपूर्व जामीन मिळविली होती. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ व त्यांच्या पथकाने पालिकेचे तत्कालीन लेखापाल वडमारे यांना सोमवारी अटक केली आहे.

अपहारातील ६५ लाख वसूल

कंत्राटी कर्मचारी ढवळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench Of Bombay High Court) दिलेल्या आदेशानुसार अपहारीत दहा लाख रुपये भरल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार चव्हाण यांनी दहा लाख २८ हजार रूपये, म्हात्रे सतरा लाख, काळे दहा लाख तर झांबरे यांनी २७ लाख ७८ हजार २९२ असे एकुण जवळपास ६५ लाख सहा हजार २९२ रूपये पालिकेत जमा केले आहेत. अपहारातील काही रक्कम भरल्याने पाच जणांची जामिन झाली होती.

अपहार रक्कमेला दंड आणि व्याज लागणार !

पावणे दोन कोटी रूपयाचा अपहार होऊन अडीच वर्ष झाली. त्यातील काही रक्कम वसुल झालेली असली तरी जीएसटी आणि आयकरच्या नियमानुसार एकुण अपहारीत रक्कमेवर २५ टक्के दंड प्रमाणे सद्यःस्थितीत त्याची रक्कम ४३ लाख ७५ हजार होते. वार्षिक अठरा टक्के व्याजाची रक्कम ७८ लाख ७५ हजार झाल्याने असे एकुण दोन कोटी ९७ लाख पन्नास हजार अपहार रक्कम गृहीत धरावी लागणार आहे. जीएसटी आणि आयकर विभागाने याची माहिती मागविल्याने रक्कम भरावी लागते. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून लवकरच याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे.

अटकेची कारवाई विलंबाने का ?

उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील सर्व आरोपींना टप्प्याटप्प्याने अटक करण्यासाठी तब्बल अडीच वर्षाचा कालावधी का लागला, आरोपी परदेशात होते का ? असा प्रश्न विचारला जातोय. आरोपींचा ठावठिकाणा माहित असुनही अटक करण्यात विलंब झाल्याची चर्चा शहरवासियात सुरू होती. दरम्यान या प्रकरणात काही 'छुपे रुस्तुम' लोकांच्या नावाची शहरवासियात चर्चा होती. मात्र त्याचे पुन्हा काय झाले. पोलिस तपासाचे आणि विशेष लेखापरीक्षण अहवालाचे नेमके काय आले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT