Aurangabad news  
मराठवाडा

फाटकन् दबलं ट्रिगर, साटकन् सुटली गोळी आणि... 

सकाळ वृत्तसेवा

भूम/उस्मानाबाद : पिस्तूल हाताळताना चुकून ट्रिगर दबल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाटसांगवी (ता. भूम) येथे घडली. घटनेनंतर पिस्तूल परवानाधारक युवकाने वालवड येथील पोलिस दूरक्षेत्रात हजर होत घडलेला प्रकार सांगितला. गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्तगीर जिलानी पटेल (वय ४०, रा. पाटसांगवी) असे मृताचे नाव आहे. मृत दस्तगीर पटेल हा मित्र बाबा पटेल (रा. पाटसांगवी, ह. मु. पुणे) याच्यासमवेत जेवणासाठी गेला होता. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. दरम्यान, बाबा पटेल याच्याकडे असलेली पिस्तूल दस्तगीर हाताळत असताना चुकून ट्रिगर दबल्याने गोळी लागून तो गंभीर जखमी झाला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दस्तगीरला उपचारासाठी तत्काळ बार्शी येथे हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. माहिती मिळताच भूमचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

पिस्तूल हाताळत असताना चुकून ट्रिगर दबले

दरम्यान, मद्यधुंद अवस्थेतील दस्तगीरने पिस्तूल बघण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी पिस्तूल हाताळत असताना चुकून ट्रिगर दबल्याने गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे यांनी सांगितले. हा प्रकार घडल्यानंतर ज्याच्या मालकीचे पिस्तूल आहे, त्याने तत्काळ वालवड येथील पोलिस दूरक्षेत्र गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली असल्याचेही श्री. पालवे यांनी सांगितले.

या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. भूम पोलिस ठाण्याचे पथक तातडीने बार्शीकडे रवाना झाले आहे. नातेवाइकांकडून अधिक माहिती घेतली जाणार असून, नेमकी माहिती समोर आल्याशिवाय याप्रकरणी काहीही सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT