Beed Accident 
मराठवाडा

नातेवाईकाच्या लग्नला जाणे राहिले; अपघातात सासरा ठार, सून व नातू गंभीर जखमी

निसार शेख

कडा  (जि.बीड) : नगर-धामणगाव बीड महामार्गावरील पाटण सांगवी शिवारात बुधवारी (ता.सहा) सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली. यात एक ठार, तर दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ गोल्हार असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आष्टी तालुक्यातील कापशी येथील रहिवासी एकनाथ गोल्हार हे सून व नातवासोबत दुचाकीने (एमएच १६ एयू ३४१९) धामणगाव येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी जात होते, तर नगर येथून बीडच्या दिशेने कार (एमएच ०६ एएफ २१९८) जात होती.

दोन्ही वाहनांची सकाळी साडेअकराच्या सुमारास धामणगाव शिवारात समोरासमोर धडक होऊन त्यात एकनाथ गोल्हार हे जागीच ठार झाले. सून व नातू हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंभोरा कडा व आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नगर येथे पाठविले. दरम्यान अपघातानंतर कारचालक पळून गेला. या प्रकरणाचा तपास अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करित आहेत.


 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gears Up for UCC : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यात घेतला जाणार मोठा निर्णय

Petrol-Diesel-CNG Price: 4 जुलैचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Latest Marathi Live Update: आता ठरणार मोठा निकाल! सहकारातील या रणधुमाळीत कोण मारणार बाजी?

Khadakwasala Dam Water : खडकवासला प्रकल्पातील धरणांत अर्धा टीएमसी पाणी वाढ

Karul Ghat Landslide : करूळ घाटातून प्रवास करताय? दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा; व्हाळात वाहून गेलेल्या तरुणाबाबतही वाईट बातमी

SCROLL FOR NEXT