Jalna Accident News esakal
मराठवाडा

Jalna Accident| भोकरदनजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता.नऊ) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ घडली. भिमराव रामा राऊत (वय ६०) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील भिमराव राऊत हे न्यायालयाच्या कामानिमित्त भोकरदन (Bhokardan) येथे आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी ते दुचाकीने गावाकडे जात असतांना भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ सिल्लोडकडून येणारी दुचाकी त्यांच्या दुचाकीला धडकली. (Man Died In Accident Near Bhokardan In Jalna District)

या अपघातात भिमराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तर दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघाताचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. (Jalna)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT