Beed Accident News esakal
मराठवाडा

अर्धवट रस्त्यामुळे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

निलेश हा घरातील कर्ता मुलगा असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता.

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड) : शहरातील पाण्याची टाकी परिसरात अंबाजोगाई-बीड राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता.२१) रात्री रस्त्याच्या बाजूच्या अर्धवट बांधलेल्या नालीला कार धडकून चालकाचा मृत्यू झाला. निलेश मधुकर पवार (वय २२, रा. मोरेवाडी, ता.अंबाजोगाई) असे मृत चालकाचे नाव आहे. चालक निलेशचा कार भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री तो कारमध्ये (एमएच १२ एचएन १२९५) डिझेल भरून यशवंतराव चव्हाण चौकाकडून घराकडे निघाला होता. तो पाण्याच्या टाकीजवळ (Beed Update) आला असता समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना त्याची कार रस्त्याच्या खाली उतरली आणि अर्धवट बांधून लोखंडी गज उघडे सोडलेल्या नालीत कोसळली. या अपघातात निलेश गंभीर जखमी झाला. (Man Died In Car Accident In Ambajogai Of Beed)

उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने स्वाराती रुग्णालयात (Ambajogai) दाखल केले. परंतु तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय मार्गाचे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. हा रस्ताच वाहनधारकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागल्याने महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.

पवार कुटुंबाला मोठे दुःख

निलेश हा पवार कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. निलेश हा घरातील कर्ता मुलगा असल्याने त्याच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्याच्या अशा अपघाती मृत्यूने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT