Jalna Accident News esakal
मराठवाडा

पैठण येथे नाथांचे दर्शन घेऊन घरी परतताना अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

एकादशी असल्याने पैठण येथे नाथांच्या दर्शनासाठी दुचाकीवर...

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील आबासाहेब जाधव व त्यांचे नातेवाईक काकासाहेब कोरडे हे दुचाकीने जात होते. दुचाकीचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आबासाहेब जाधव यांचा मृत्यू झाला आहे, तर काकासाहेब कोरडे हे जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,अंबड (Ambad) तालुक्यातील लोणार भायगाव येथील आबासाहेब नारायणराव जाधव (वय ४५ ) व हनुमाननगर येथील त्यांचे नातेवाईक काकासाहेब बाबुराव कोरडे हे मंगळवारी (ता.१२) पहाटेच एकादशी असल्याने पैठण (Paithan) येथे नाथांच्या दर्शनासाठी दुचाकीवर गेले होते. (Man Died, Other Injured In Accident In Ambad Taluka Of Jalna)

दर्शन करून आपल्या गावाकडे परत येत असताना पैठण-पाचोड मार्गावरील दावलवाडी येथील तलावालगत दुचाकी वेगात असल्याने अचानक टायर फुटल्याने जोराचा अपघात झाला. यामध्ये आबासाहेब जाधव यांचा मृत्यू, तर काकासाहेब कोरडे हे जखमी झाले. त्यांच्यावर अंबड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. (Jalna Accident News)

आबासाहेब जाधव यांच्यावर लोणारभायगाव येथील स्मशानभूमीत दुपारी दीड वाजेच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई-वडील, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT