Nanded Photo 
मराठवाडा

निफा - `सप्तरंग’च्या मानुसकीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉकडाऊनच्या भितीने अनेकांची कामाचे ठिकाण सोडले आहे. अनेकांनी घर किरायासाठी पैसे नाहीत म्हणून गाव सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यांना सरकारने आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सुचना दिल्या आहेत. परंतु कुणी मानायलाच तयार नाही. यासाठी राज्य शासनाने स्वंयसेवी संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या आवाहनास प्रतिसाद देत ‘निफा’ आणि ‘सप्तरंग’ संस्थेने पुढकार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० पासून ते १४ एप्रिल २०२० पर्यंत २१ दिवसाचे लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहणार नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळुन उपाययोजना करत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे- ‘या’ तालुक्यात १२३१ जण ‘होम क्वारंटाइन’

संचारबंदी उठेपर्यंत निफा - सप्तरंग’ सेवा
लॉकडाऊनमुळे नांदेड शहरात अडकुन पडलेल्या गरजवंतांना शोधुन ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जेवण, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, चहा, नाष्टा अशा सुविधा पुरविल्या जात आहेत. याशिवाय संचारबंदी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच स्वच्छता कर्मचारी कोरोनाला हरविण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. त्यांची देखील जेवणाची गैरसोय होत आहे. हॉटेल व खानावळ बंद असल्यामुळे बाहेर गावाहून नांदेडमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन मिळत नाही. तसेच अनेक निराधारांना भोजन देण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे संचारबंदी उठेपर्यंत नांदेड शहरात ‘निफा’ व ‘सप्तरंग’ सेवाभावी संस्थेतर्फे जेवण दिले जाणार आहे.

जिल्हाधिकारी यांची परवानगी
‘निफा’ व ‘सप्तरंग’ सेवाभावी संस्था विविध सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असते. आता सुद्धा संचारबंदीमध्ये सुद्धा जेवण पुरविण्यात येत आहे. सध्या संचारबंदी काळात देखील मोठ्या प्रमाणात गरजु, जे दररोज उदरनिर्वाह करतात अशा अनेक जणांना जेवण देण्याचं काम ही संस्था करीत आहे. पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यातर्फे परवानगी घेऊन स्वतःची काळजी घेत सर्वांना जेवण पुरवण्याचे काम या संस्थचे स्वंयसेवक करीत आहेत. यामध्ये प्रदेश अध्यक्ष डॉ. भरत जेठवाणी, जिल्हाध्यक्ष भास्कर डोईबळे, अष्टगाथा जयवंत कावळे, शुभम भारतीय, साईनाथ कुलथे, आकाश बागडे, नईम खान, सुनील बडकलु, जगदीश जेठवाणी, दाईम कुरेशी यांचा समावेश असून, जमेल त्या पद्धतीने जेवण आणि जिवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी ही सर्व टीम प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT