Manoj Jarange Patil  sakal
मराठवाडा

Manoj Jarange : आरक्षण नाही तर सत्ता नाही : जरांगे

Manoj Jarange : आरक्षणासाठी मराठा समाजाचा लढा अद्याप सुरू आहे. मनोज जरांगे यांनी चेतावणी दिली की, आरक्षण न दिल्यास सत्ताधारी पक्षांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे झालेल्या विराट सभेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा लढा आजही सुरूच आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आरक्षण दिले नाही तर तुम्हाला सत्ता नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी माध्यमांशी बोलताना दिला.

ते म्हणाले, मुंबईतील काही नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय शासनाने घेतला. राज्यातील अन्य नाक्यांवरही शासनाने टोलमाफी करावी. शासन नेहमी जनतेसोबत दुजाभाव करत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत काही चर्चा झालेली नाही. श्रीक्षेत्र नारायणगडावर झालेल्या विराट दसरा मेळाव्यातून सरकार बोध घेईल. समाज आता मागे हटणार नाही.

मग डाव टाकतो...

आम्हाला राजकारणात जायचे नाही. आरक्षण द्यावे, अन्यथा तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा रोष सत्ताधारी पक्षाला परवडणारा नाही. एकदा तुमचे उमेदवार जाहीर होऊ द्या, मग डाव टाकतो, असा इशारा जरांगे यांनी दिला. वंचितांना न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. गोरगरिबांची सत्ता आली, तर कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही, असे आवाहनही त्यांनी केले.

आचारसंहिता लागू होईपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर उमेदवार उभे करायचे की समोरच्यांचे पाडायचे, हे ठरविणार. तोपर्यंत सत्ताधारी काय निर्णय घेतात, याची वाट पाहणार आहे.

- मनोज जरांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT