Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मनोज जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप म्हणाले, 'सरकारने माझा जीवच घ्यायचं ठरवलंय'

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.

सकाळी डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांना सलाईन लावलं आहे. त्यांना घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने जरांगेंना नीट बोलताही येत नाही. जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक उपोषणस्थळी हजर झालं. त्यांनी जरांगे यांना सलाईन लावत त्यांच्यावर प्राथामिक उपचार सुरू केले. उपचारानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 'सरकारने माझा जीवच घ्यायंच ठरवलंय, दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही. राज्य सरकारच्या मनात काय चाललंय, हे माहित नाही, आम्ही फक्त आशेवर आहोत, असं ते बोलताना म्हणाले आहेत.

त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. दुसरीकडे जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्यासाठी गेले होते.

दरम्यान, सरकार लवकरात लवकर जीआर काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी जरांगेंना दिलं आहे. त्यावेळी संदीपान भुमरे यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, तरी देखील जरांगे यांनी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT