marathwada Esakal
मराठवाडा

Marathwada : कत्तल खाणे बंद करण्यासाठी गंगापूरमध्ये कडकडीत बंद; गोरक्षक दलाच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद

गंगापूर येथील पलिकेसमोर सुरू असलेले उपोषण दुसऱ्या छायाचित्रात कडकडीत बंद.

बाळासाहेब लोणे

गंगापूर - रामगिरी महाराजांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन हादरले असून, शहरातील कत्तलखाणे बंद व्हावेत यासाठी शहरवासियांनी कडकडीत बंद ठेवला आहे. तसेच गोरक्षक दलातर्फे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रात गोवंश बंदी कायदा असूनही गंगापूर शहरात अवैध पणे दररोज असंख्य वंशांची हत्या करण्यात येत आहे हे गेल्या अनेक वर्षापासून गोरक्षक दलाकडून प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत

नसल्याने गोरक्षक दल बजरंग दल विश्व हिंदू परिषद सह हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे भूमिका घेत आमरण उपोषण सुरू केलेले आहे. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज व महंत रामगिरी महाराज यांनी भेट दिली. यावेळी रामगिरी महाराज यांनी दसऱ्यापर्यंत प्रशासनाला कत्तलखाणे बंद करण्याचे आवाहन केले आहे.

नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. शहरात संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. आ.प्रशांत बंब यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली तसेच मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांना कत्तलखान्यांला सील करण्याचे सांगुन ती जागा अधिग्रहण करण्याची सुचना दिली. उपोषणस्थळी मनीष वर्मा, गणेश पुराणिक, चंद्रकांत लांडे ,योगेश नाबरिया राधेश्याम कोल्हे , भाऊसाहेब सोनवणे , श्रीकांत नावंदर हे उपोषणास बसले आहेत.

प्रशासनाच्या वेगवान हालचाली

उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासना कडून मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आहे तसेच काही मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू झाली

असली तरी उपोष कर्ते आपल्या मागणीवर ठाम असून गंगापूर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील . तसेच प्रशासनाकडून याबाबत जसजशी दिरंगाई होईल तसे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT