Nanded News 
मराठवाडा

Video : मराठवाडा, विदर्भ प्रदेश बनलाय शेतकरी आत्महत्यांचे केंद्र : कसे ते वाचा

प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत मराठवाडा आणि विदर्भ शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेले आहे. या प्रदेशात २००५ ते २०१९पर्यंत ८८ हजारपेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.  म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठवाड्यात होत असल्याने हा विषय केंद्रस्थानी ठेवण्याची आग्रही भूमिका समाजवादी जन परिषदेची आहे, असे अध्यक्ष विष्णू ढोबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  

या कारणामुळे होतात आत्महत्या
उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रस्ते, आर्थिक सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांत अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अपुरं सिंचन, अपुरे उद्योग, अपुरा विकासामुळे रोजगाराच्या संधी कमी आहे. या सगळ्या अभावग्रस्त परिस्थितीचा परिणाम शेती क्षेत्रामध्ये झालेला आहे. परिणामतः मराठवाडा, विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी आणि शेतीमधील वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांशी सामना करण्यातच हतबल झाल्याने तो आत्महत्या करत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने मराठवाडा व विदर्भात अधिक आर्थिक गुंतवणूक करून रोजगारनिर्मिती करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक असल्याची भूमिकाही श्री. ढोबळे यांनी मांडली.

साहित्य समाजाचा आरसा आहे
साहित्य म्हणजे समाजाचा आरसा आहे. साहित्यिक हे शब्दांचे उत्तमोत्तम अर्थ लावणारे, शब्दांचा विधायक अर्थ सांगणारे समाजातील जानती मंडळी आहेत. त्यामुळे साहित्य संमेलनांमध्ये समाजातील ज्वलंत प्रश्‍नांचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर हे संमेलन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शासनाने गंभीर विचार करण्याची गरज
शेतकरी आत्महत्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. भारतीय संविधानातील कलम २१मध्ये सर्वांना मूलभूत अधिकार देतो. या कलमाला पारित करताना सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले, की जीवन जगण्याचा हा केवळ मुलभूत अधिकार नसून ते सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा तो अधिकार आहे. असे असतानाही देशात मोठ्याप्रमाणावर शेतकरी आत्महत्या होतात हे कोणत्या लोकशाही समाजवादी व्यवस्थेचे लक्षण आहे? असा प्रश्‍न उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारने याविषयी गंभीर विचार करावा, अशी मागणीही श्री. ढोबळे यांनी केली.

साहित्य संमेलनाकडून अपेक्षा
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. देशातील मुलींसाठी फुले दाम्पत्यांनी पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे स्थापन केली. आज ही इमारत मोडकळीस आली असून, महाराष्ट्र शासनाने ही जागा संपादित करून शाळेचे राष्ट्रीय स्मारक तयार करावे तसेच साहित्य संमेलन मराठवाड्यात होत असल्याने शेतकरी आत्महत्या हा विषय केंद्रस्थानी ठेवावा, असा प्रस्ताव महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे दिल्याचेही श्री. ढोबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ताला अटक

SCROLL FOR NEXT